पुढची लढाई 'राईट टू रिकॉल' - अण्णा

लोकपाल विधेयकावर लोकसभेत गरमागर चर्चा सुरू असता ज्येष्ठ समाजसेक अण्णा हजारे यांनी सरकारी लोकपालाबाबत जोरदार आक्षेप घेतला. यावेळी केंद्र सरकावर टीकेची झोड उठवली. आता पुढची लढाई 'राईट टू रिकॉल' ची असेल असे अण्णा यांनी मुंबईत जाहीर केले. सरकारविरोधात एकत्र लढण्यासाठी अण्णांनी रामदेवबाबांना हाक दिली आहे. तर विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

Updated: Dec 27, 2011, 05:44 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

लोकपाल विधेयकावर  लोकसभेत गरमागर चर्चा सुरू असता ज्येष्ठ समाजसेक अण्णा हजारे यांनी  सरकारी लोकपालाबाबत जोरदार आक्षेप घेतला. यावेळी केंद्र सरकावर टीकेची झोड उठवली.  आता पुढची लढाई  'राईट टू रिकॉल' ची असेल असे अण्णा यांनी मुंबईत आज जाहीर केले.  सरकारविरोधात एकत्र लढण्यासाठी अण्णांनी रामदेवबाबांना हाक दिली आहे.  तर विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज  यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

 

सरकार देशाला वारंवार धोका देत आहे. माझी प्रकृती ठिक नाही.  मात्र, जनतेच्या ऊर्जेमुळे मला शक्ति मिळत आहे. स्वातंत्र्य लढ्याची पुन्हा लढाई  लढत आहे. जोपर्यंत हा लढा जीवात जीव असेपर्यंत लढत राहणार आहे.  देशाच्या भल्यासाठी त्याग करावा लागतो .  देशासाठी मरण आले तरी आनंद होईल. लोकपालबाबत दिलेले आश्वासन सरकारने पाळलेले नाही. सरकार धोका देत आहे. ही जनतेशी धोकाबाजी आहे. आता जनता सरकारला धडा शिकविल, असा इशारा हजारे यांनी यावेळी दिला.

 

नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. त्यासाठी लोकसभा निवडणुकीत देशात प्रचार करणार आहोत. आता मागे हटायचे नाही. त्यासाठी नवुयुवकांनो आगामी जेलभरो आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा. कारण स्वातंत्र लढ्याची दुसरी लढाई आहे.  संसदेची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी जनमत सरकारने घेतले पाहिजे. कारण लोकशाहीत जनता मोठी आहे. जनता मालक आहे. राजकीय नेते हे जनतेचे सेवक आहेत. त्यामुळे कायदा बनवायचा असेल तर जनतेला विश्वासात घ्यायला हवे, अशी मागणी अण्णा यांनी केली.

 

शेतकऱ्यांची जमीन बळकावण्याचा सरकारला अधिकार नाही.  जनजागृतीसाठी पाचही राज्यात जाऊन विधानसभा निवडणूकीत सरकारविरोधात प्रचार करणार आहे. तसेच निवडणुकीत उमेदवार नाकारण्याचा अधिकार हवा. तसा अधिकार देण्यासाठी आता पुढचे पाऊल टाकावे लागणार आहे. आता पुढची लढाई  'राईट टू रिकॉल' ची असेल, असे अण्णांनी जाहीर केले. भ्रष्टाचार संपविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी  अण्णांनी संघर्ष  करण्याची तयारी दर्शवली आहे. रामदेवबाबांना अण्णांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. एकाच मंचावर या, मिळून सरकारविरोधात एकत्र लढू, असे अण्णा म्हणाले.

 

मीडियामुळे आपले आंदोलन घराघरात पोहोचले आहे. जनतेबरोबरच मीडियाने साथ दिल्याने आपल्याला अधिक ऊर्जा मिळत आहे. त्यामुळे आजारी असून सुध्दा मी तुमच्या पुढे आहे, असे अण्णांनी सांगितले. दरम्यान,  सरकारने लोकसभेत सादर केलेले कमकुवत लोकपाल विधेयक मागे घ्यावे आणि देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी जनलोकपाल विधेयक स्वीकारावे, अशी मागणी टीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी आज येथे केली.

 

तीन दिवसांच्या या उपोषण आंदोलनाचा उद्देश लोकसभेला कमी लेखण्याचा नाही, तर सरकारची लोकपाल आवृत्ती फेटाळण्याचे लोकप्रतिनिधींना आवाहन करण्यासाठी आहे. प्रत्यक्षात हे विधेयक भ्रष्ट व्यक्तींना संरक्षण देणारेच आहे, असे मुंबईतील एमएमआरडीए मैदानावरील आंदोलनस्थळी पत्रकारांशी बोलताना केजरीवाल म्हणाले.

 

[jwplayer mediaid="19240"]