केक घेतला नाही म्हणून घरात घुसला अन्... एकतर्फी प्रेमातून तरुणाचं धक्कादायक कृत्य
Pune Crime : पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणाने एका तरुणीवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे.
Aug 26, 2023, 11:50 AM ISTधारावीत काँग्रेसला मोठा धक्का; वर्षा गायकवाड यांच्या 4 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
Mumbai News : शिवसेनेपाठोपाठ आता काँग्रेसलाही शिंदे गटाने मोठा धक्का दिला आहे. काँग्रेस आमदार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघातील माजी नगरसेवकांना पक्षाचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
Aug 26, 2023, 11:11 AM ISTमुलीला तुम्ही आवडताय? 'अशी' वागली तर समजून जा
Relationship Tips: मैत्रिणींसोबत जाताना तुमच्याशी डोळ्याने संपर्क साधते. मैत्रिणींना कोपऱ्याने मारुन मानेने खुणावते. कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करते. तुमच्या सोबत राहण्यासाठी कारणे शोधते. तुमच्याकडे ती स्वत:च्या कपड्यांकडे, मेकअपकडे किंवा केसांकडे लक्ष देण्यास भाग पाडते.
Aug 26, 2023, 10:48 AM ISTMRVC Job: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये भरती, पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज
MRVC Recruitment: प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 22 ऑगस्ट 2023 रोजी 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. एससी/एसटी उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे
Aug 26, 2023, 09:12 AM ISTकसा व्हायचा महाराष्ट्र गतिमान? शाळेत शिक्षक नसल्याने इयत्ता पहिलीतल्या मुलांना शिकवतायत चौथीचे विद्यार्थी
Amravati News : अमरावतीच्या जिल्हा परिषद शाळेतील हा प्रकार पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. शिक्षक नसल्यामुळे चौथीचे विद्यार्थी पहिली दुसरीच्या मुलांना शिकवत असल्याचे पाहायला मिळालं आहे. वरिष्ठांच्या दबावामुळे हे सुरु असल्याचे पालकांनी म्हटलं आहे.
Aug 26, 2023, 08:05 AM ISTMaharashtra Rain : आता पाऊस आला नाही तर...; हवामान विभागाकडून थेट इशारा
Maharashtra Rain : राज्यातून सध्या पावसानं काहीसा काढता पाय घेतला असून, हलक्या सरी वगळता कुठंही पावसानं समाधानकारक हजेरी लावलेली नाही.
Aug 26, 2023, 07:01 AM IST
HPCL मध्ये बंपर भरती, मुंबईत नोकरी आणि 2 लाखांवर पगार; 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक
HPCL Recruitment 2023: या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 50 हजार ते 2 लाख 80 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
Aug 25, 2023, 06:25 PM ISTशेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, नाफेडनं कांदा खरेदी करणं सोडून लावला अटी, शर्थींचा बॅनर
NAFED Banner: केवळ दर्जेदार कांदाच खरेदी केला जाणार असल्याचा उल्लेख या बॅनरवरील अटींमध्ये करण्यात आलाय. त्यामुळे नाफेडची कांदा खरेदी केवळ गाजर ठरण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये नाफेडने बाजार समितीत कांदा खरेदी न करता केवळ बॅनर लावून शेतकऱ्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न केला आहे.
Aug 25, 2023, 05:10 PM ISTViral Video: भंगारातल्या गाड्या चालवतेय एसटी महामंडळ! हातात छत्री घेऊन पळवावी लागली बस
Gadchiroli News : हातात छत्री घेऊन एसटी बस चालवणाऱ्या चालकाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. गडचिरोलीतील एका बस आगारातील बसचा हा व्हिडीओ असल्याचे समोर आलं आहे.
Aug 25, 2023, 03:47 PM ISTलहान भावाने दिली सख्ख्या भावाची सुपारी, विरार ते नेपाळपर्यंत सापडले धागेदोरे
Mumbai News : मुंबईत लहान भावानेच मोठ्या भावाला संपवण्याच कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी लहान भावासह चार आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील एक आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आलं आहे.
Aug 25, 2023, 12:40 PM ISTमुंबईकरांनाो काळजी घ्या! भटक्या कुत्र्यांची संख्या तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी वाढली
Mumbai Streets Dogs:2014 मध्ये केलेल्या भटक्या कुत्र्यांच्या गणनेनुसार मुंबईतील त्यांची लोकसंख्या 95 हजार इतकी होती. आता मुंबई शहरातील भटक्या कुत्र्यांची लोकसंख्या 1 लाख 64 हजारांवर पोहोचली आहे. जी 2014 च्या तुलनेत जवळपास 72 टक्क्यांनी जास्त असल्याचे म्हटले जात आहे.
Aug 25, 2023, 11:10 AM ISTचांद्रयान 3 यशस्वी मोहिमेत नागपूरकर युवा शास्त्रज्ञाचे 'असे' योगदान
Nagpur Chandrayan scientist: चांद्रयान 3 च्या ऐतिहासिक मोहिमेत नागपूरकर युवा शास्त्रज्ञ अद्वैत दवने याचेही योगदान होते अद्वैत दवने हा नागपूरकर चांद्रयन 3 मोहिमेत सेन्सर टेस्टिंगची जबाबदारी असलेल्या टीममध्ये होता.
Aug 25, 2023, 09:42 AM IST'विविध मार्गांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न'; भाजप आमदार प्रसार लाड यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
BJP MLA Prasad Lad : मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये गायकवाड नामक व्यक्तीने जीवे मारण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत असल्याचे प्रसाद लाड यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे.
Aug 25, 2023, 09:13 AM ISTMaharashtra Rain : भ्रमनिरास! राज्यातील पावसाच्या पुनरागमनाची तारीख आता आणखी लांबली
Maharashtra Rain : महाराष्ट्रातून ऐन मोसमामध्ये नाहीसा झालेला पाऊस ऑगस्ट महिन्यात तरी परतणार का, अशाच आशावादी नजरेनं अनेकांनी आभाळाकडे पाहिलं. पण, पावसानं मात्र इथंही चकवा दिला.
Aug 25, 2023, 08:10 AM IST
'लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार आमच्यासोबत येतील'; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
Marathi News Today: राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत असं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरु झाली आहे. अशातच शरद पवार हे भाजपसोबत येणार असल्याचे वक्तव्य बड्या नेत्याने केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Aug 25, 2023, 07:31 AM IST