marathi batmya

Saturday Upay: आपल्या जीवनात चांगले बदल हवे असतील तर शनिवारी करा हे उपाय, मग बघा जादू

Shani Dev: शनीदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले जातात. हे उपाय तुम्ही केले तर तुमच्या जीवनात चांगले बदल घडून येतील. शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी केलेले काही ज्योतिषी उपाय एखाद्या व्यक्तीचे भाग्य बदलू शकतात आणि शनिदेवाच्या कृपेने प्रत्येक संकटातून मुक्ती मिळू शकते. 

Nov 12, 2022, 09:42 AM IST

Global Carbon Budget 2022: जगाचा विनाश केवळ 9 वर्षे दूर! हे बाबा वेंगाचे भाकीत नसून शास्त्रज्ञांचा रिपोर्ट

United Nations Climate Summit 2022: जगाच्या अंताबाबत अनेक भाकीते करण्यात आली आहेत. मात्र, आता शास्त्रज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे. तसा शास्त्रज्ञांचा रिपोर्ट आहे.  ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटादरम्यान, इजिप्तमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान शिखर परिषदेच्या COP 27 मध्ये एक चिंताजनक अहवाल समोर आला आहे. यामुळे लोकांची झोप उडाली आहे. जगावरील संकट अधिक गडद होताना दिसत आहे.

Nov 12, 2022, 09:04 AM IST

Rain Alert: पुन्हा एकदा पावसाचा इशारा, जोरदार पावसाच्या शक्यतेने शाळा-कॉलेज बंद; हवामान विभागाचा अलर्ट

Rain News : यावर्षी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. ऑक्टोबर महिन्यातही जोरदार पाऊस झाला. आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार पावसाच्या शक्यतेने शाळा-कॉलेज बंद या राज्यात ठेवण्यात येणार आहेत. भारतीय हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. (IMD Rain Alert) नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडणार असल्याने (Weather Updates 12 November)थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Nov 12, 2022, 08:18 AM IST

Home Loan : घर खरेदीसाठी कर्ज झालं स्वस्त; आणखी एका बँकेने व्याजदर केले कमी, इतक्या दिवसांची ऑफर

BOB Home Loan: घर घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आणखी एका बँकेने होमलोन व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे घर खरेदीदारांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. या बँकेने गृहकर्जाचे व्याजदर कमी केले असताना काही दिवसांची ऑफर दिली आहे. BOB चा हा गृहकर्ज दर SBI आणि HDFC पेक्षा कमी आहे, ज्यांचे नवीन दर 8.40 टक्के आहेत. नवीन दर येत्या सोमवारपासून लागू होणार असून डिसेंबर अखेरपर्यंत लागू राहतील, असे बँकेने म्हटले आहे.

Nov 12, 2022, 07:14 AM IST

Measles outbreak : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, आतापर्यंत 'या' आजाराचे 74 रुग्ण आढळलेत

मुंबईत गोवरची साथ ( Measles ) आली असून आतापर्यंत 74 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गोवरच्या वाढत्या रुग्णसंख्येनंतर आता मुंबई महानगरपालिका (BMC) अलर्ट झाली आहे. गोवर संक्रमण असलेल्या भागात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच आरोग्य शिबिरंही घेतली जात आहेत. गोवर प्रादुर्भावाचा आढावा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीनेही घेतला आहे. या समितीने गोवंडी भागात पाहणी केली.  

Nov 11, 2022, 03:12 PM IST

Shoe Theft Case: चालत्या रेल्वेत सीटखालून बुटाची चोरी, दोन राज्यांचे पोलीस घेतायेत शोध

Viral News : आता एक बातमी रेल्वे प्रवासातील आहे. चक्क चोरट्याने बूटाची चोरी केली आहे. धावत्या रेल्वेमधून एका प्रवाशाचे बूट चोरीला गेले, याप्रकरणी त्याने रेल्वे स्थानकावर तक्रार केली. त्यानंतर दोन राज्यांचे पोलीस चोरीला गेलेल्या बुटांचा आणि चोराचा शोध घेत आहेत. ही न्यूज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Nov 11, 2022, 01:44 PM IST

मुंबईत 'या' आजाराचा शिरकाव; काय आहेत लक्षणे आणि कशी घ्याल काळजी, अधिक वाचा

BMC confirm measles outbreak : मुंबई शहर आणि परिसरात गोवर आजाराचा फैलाव झाला आहे.  (Measles Outbreak In Mumbai) लहान मुलांमध्ये आढळणारा हा गंभीर विषाणूजन्य संसर्ग आहे.  त्यामुळे भीती पसरली आहे. या आजाराची लक्षणे काय आहेत आणि याबाबत कशी काळजी घ्यावी, याबाबत अधिक जाणून घ्या.

Nov 11, 2022, 12:34 PM IST

Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आतच राहणार की बाहेर येणार?, आज फैसला

Political News : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणाऱ्या प्रवीण राऊत यांना ईडीने दणका दिला आहे.  आज या दोघांच्याही जामीन अर्जावर निकाल येण्याची शक्यता आहे.  

Nov 9, 2022, 08:36 AM IST

Earthquake in Delhi: वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणानंतर जोरदार भूकंप, दोघांमध्ये काय आहे संबंध?

Earthquake in Delhi: चंद्रग्रहण आणि भूकंप याचा संबंध असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. ज्योतिषांच्या मते चंद्रग्रहण थेट भूकंपासारख्या (Grahan aani Bhukamp) नैसर्गिक आपत्तीशी संबंधित आहे. ग्रहण हे ज्योतिषशास्त्रात अशुभ आणि घातक परिणाम करणारे मानले जाते. 31 जानेवारी 2018 रोजी चंद्रग्रहण होण्यापूर्वी दिल्ली-एनसीआर, पाकिस्तान आणि कझाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.1 इतकी होती. 

Nov 9, 2022, 07:00 AM IST

Dry Skin Remedy: हिवाळ्यात 'या' फळाचे दूध दिवसभर त्वचा ठेवेल चमकदार, कोरड्या त्वचेवर भारी उपाय

Glowing Skin Tips: हिवाळा सुरु झाला आहे. थंडीची चाहूल लागली असून या दिवसात तुमची त्वचा कोरडी किंवा ड्राय होत असेल तर तुमच्यासाठी एक सोपा उपाय आहे.  जर तुम्हाला तुमची त्वचा चमकदार आणि मॉइश्चरायझ ठेवायची असेल, तर त्यासाठी तुम्ही 'या' फळाचे दूध लावू शकता. त्यामुळे चेहऱ्यावर हे दूध लावण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.

Nov 8, 2022, 08:06 AM IST

Weight Loss: फक्त लिंबूच नाही तर लिंबाची साल करते वजन कमी, असे करा सेवन

Lemon Peels For Weight Loss: अनेकांना आपल्या वाढत्या वजनाचे टेन्शन असते. आता वजन कमी करण्यासाठी व्यायामावर भर न देता सहज कमी करु शकता. लिंबाची साल वजन कमी करण्यासाठी कामी येते. लिंबाने वजन कमी कसे करावे हे माहित आहे. फक्त लिंबूच नाही तर त्याची साल वजन कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. याचे सेवन कसे करावे ते जाणून घ्या.

Nov 8, 2022, 06:57 AM IST

Andheri Bypoll Result: ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांना 66 हजार मतं, तर दुसऱ्या पसंतीची मतं नोटाला

Maharashtra Political News : राज्यातल्या बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा (Andheri Bypoll Result) निकाल अखेर हाती आलाय.  

Nov 6, 2022, 03:15 PM IST

Rutuja Latke : अंधेरी मतदारसंघात ठाकरे गटाचीच सत्ता, ऋतुजा लटके विजयी

Maharashtra Political News : राज्यातील बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा (Andheri Bypoll Result 2022) निकाल काही वेळातच जाहीर होईल. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ( Maharashtra Political News Update) विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. 

Nov 6, 2022, 01:53 PM IST