बिहार : चौकाचे नाव ठेवले 'मोदी चौक' तर कापली मान
बिहारच्या दरभंगामध्ये भाजपच्या नेत्याच्या वडिलांची मान कापल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपचे नेत्याने एका चौकाचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर 'मोदी चौक' ठेवले होते. या मुद्द्यावरून खूप वाद झाला होता. भाजपच्या नेत्याचा आरोप आहे की बाईक स्वार ५०-६० जणांनी माझ्या वडिलांची मान कापून हत्या केली. या गर्दीत त्याच्या भावालाही मारण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले आहे. जखमी युवकाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Mar 16, 2018, 08:38 PM IST