हार्बरची रेल्वे वाहतूक सुरू, गती कमी
हार्बर मार्गावरील गोवंडी ते चेंबूर स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मंगळवारी दुपारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली. मात्र, युद्धपातळीवर काम करण्यात आल्यानंतर हार्बरची सेवा सुरू झाली आहे.
Jun 18, 2013, 06:15 PM ISTपुणे-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत
शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावासाचा पुणे-मुंबई रेल्वे वाहतुकीला फटका बसलाय. आकुर्डी ते चिंचवड दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. डेक्कन क्वीन चिंचवड येथे थांबविण्यात आली होती.
Jun 16, 2013, 10:06 AM ISTमंत्रालयात धडाडणार ‘रेल्वे सेल’
राज्यामध्ये आता रेल्वे प्रकल्प रखडणार नाहीत, प्रकल्पांची कामे अधिक वेगाने होतील. याचं कारण म्हणजे राज्यशासनानं मंत्रालयात ‘रेल्वे सेल’ची स्थापन केला आहे. या सेलमध्ये रेल्वे अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलीय.
Jun 13, 2013, 08:34 AM ISTखूशखबर... रेल्वे आरक्षण आता २ महिने अगोदर
रेल्वे मंत्रालयाकडून आगाऊ तिकीट आरक्षण बुकिंग सेवेचा कालावधी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Apr 26, 2013, 12:09 PM ISTगुड न्यूज : वसई-दिवा मार्गावर लोकल!
वसई - दिवा रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर... आता या रेल्वेला उपनगरीय रेल्वेचा दर्जा मिळणार आहे. त्यामुळं या मार्गावरुन लवकरच लोकल ट्रेन धावताना दिसणार आहेत.
Apr 4, 2013, 10:57 AM ISTरेल्वे, बस प्रवास आजपासून महाग
अर्थसंकल्पातील तरतुदी आज १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. याचा भार आता सामान्यांच्या खिशावर पडणार आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींसोबत रेल्वेचे आरक्षण आणि बेस्टचा प्रवासही महागणार आहे.
Apr 1, 2013, 06:40 AM ISTबलात्कार पीडितेच्या नावाने नवी रेल्वे?
भारतीय रेल्वेच्या नव्या आगगाडीला नवी दिल्लीतील सामूहिक बलात्कार पीडित मुलीचं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे. लवकरच छपरा-आनंद विहार एक्सप्रेस या आठवड्यातून एकदा प्रवास करणाऱ्या रेल्वेला ‘निर्भया एक्सप्रेस’ किंवा ‘बेटी एक्सप्रेस’ हे नाव देण्यात येऊ शकतं.
Mar 14, 2013, 05:03 PM ISTमध्य रेल्वेची आणखी एक लोकल, सेमी फास्ट गाडीही
मध्य रेल्वेने गर्दीवर मात करण्यासाठी नामी युक्ती शोधली आहे. त्यामुळे प्रवाशांना थोडासा दिलासा मिळणार आहे. दुस-या लोकलसाठी १५ एप्रिलचा मुहूर्त काढला आहे. तर दोन मार्गावर सेमी फास्ट गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.
Mar 14, 2013, 12:26 PM ISTहार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
वडाळा ते जीटीबी दरम्यान हार्बर मार्गावर लोकलचा डबा रुळावरून घसरल्याने हार्बरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज सायंकाळी चार वाजता ही घटना घडली.
Mar 5, 2013, 05:20 PM ISTआता महाराष्ट्रातील रेल्वे समस्या मार्गी?
महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांबाबत फेरविचार व्हावा यासाठी शुक्रवारी सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेऊन समस्या दूर करण्याची विनंती केलीय. यावेळी समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.
Mar 4, 2013, 10:01 AM ISTरेल्वेत नोकरीची संधी, १ लाख ५२ हजार भरती होणार
केंद्रीय रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी आज लोकसभेत रेल्वे बजेट मांडला. या रेल्वे बजेट राज्यासह देशाचीही निराशाच केली असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.
Feb 26, 2013, 02:59 PM ISTमुंबईच्या पदरी निराशा, केवळ एसी डबे, ७२ लोकल फेऱ्या
मुंबईत सहा आणि ठाण्यात चार खासदार असताना मुंबईसाठी या खासदारांनी रेल्वेबाबत काहीही सूचना केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईच्या पदरी निराशा आली आहे. रेल्वे अर्थसंकल्पात केवळ ७२ नव्या लोकल आणि लोकलच्या गाड्यांना वातानुकुलीत (AC) डबे जोडण्याचा विचार करण्यात आला आहे.
Feb 26, 2013, 02:17 PM ISTरेल्वेची मागच्या दाराने भाडेवाढ... प्रवाशांना ठेंगा
आर्थिक वर्ष २०१३-१४ साठी रेल्वे बजेट आज जाहीर करण्यात आला. रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी आज रेल्वे बजेट लोकसभेत सादर केला.
Feb 26, 2013, 02:09 PM ISTरेल्वेमंत्र्यांकडून प्रवाशांची फसवणूक; पु्न्हा दरवाढ लादणार?
तोटा भरुन काढण्यासाठी प्रवाशांच्या खिशावर पुन्हा डल्ला मारण्याचा घाट रेल्वे मंत्रालयानं घातलाय. अर्थसंकल्पात पुन्हा रेल्वेच्या भाड्यात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत, याचाच अर्थ असा होतो की, रेल्वे मंत्री लाखो प्रवाशांची फसवणूक करत आहेत.
Feb 8, 2013, 09:48 AM ISTमुंबई लोकलचे नवे तिकीटदर
मुंबई लोकलच्या नव्या तिकीटदरात आता ३३ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे भाडेवाढ निर्णयाबद्दल प्रवासीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नव्या भाडेवाढीनुसार सेकंड क्लासचे चार रुपयांवरून पाच रूपये तर फर्स्ट क्लासचे किमान तिकीट ४५ रुपयांवरून ५० रुपयांवर गेले आहे. २२ जानेवारीपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे.
Jan 16, 2013, 10:35 AM IST