rains

मुंबईत पुढील ४ तासात अतिवृष्टी होण्याचा इशारा

भारतीय हवामान खात्याने दुपारी १.०० वाजता दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील ४ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, अलिबाग, डहाणू व भोवतालच्या परिसरात अतिवृष्टी होणार आहे.  त्याच बरोबर पुढील ४८ तासात उत्तर मध्य महाराष्ट्र व उत्तर कोकणासाठी अतिवृष्टीचा हवामान खात्याने इशारा दिलेला आहे. 

Aug 29, 2017, 04:43 PM IST

मुसळधार पाऊस, गरज असेल तर बाहेर पडा : मुंबई पालिका

शहरात जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे अति महत्वाचे काम असल्‍याच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

Aug 29, 2017, 03:49 PM IST

मुंबईत पावसामुळे हाल

मुसळधार पाऊस कोसळत असल्याने वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतूक सेवेवर झालाय. रेल्वेचा वेग मंदवलाय तर विमान सेवा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल झालेत. शहरात सर्वत्र पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने पाण्यातून रस्ता शोधण्याची वेळ वाहनधारकांवर आलेय. रुळावर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक अत्यंत धीम्यागतीने सुरु आहे.

Aug 29, 2017, 03:03 PM IST

मुंबईला मुसळधार पावसाचा फटका, विमानसेवाही ठप्प

मुसळधार पाऊस कोसळत असल्याने वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतूक सेवेवर झालाय. रेल्वेचा वेग मंदवलाय तर विमान सेवा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल झालेत.

Aug 29, 2017, 02:06 PM IST

रत्नागिरी जिल्ह्यात सलग ४ दिवसापासून पाऊस

गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात एकूण 389.80 मिमी पाऊस पडलाय. तर सरासरी 43.31 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

Aug 28, 2017, 08:20 PM IST

४८ तासात कोकणसह मराठवाडा, विदर्भात जोरदार पाऊस

येत्या ३१ तारखेपर्यंत राज्यातला पाऊस असाच सुरू राहण्याचा अंदाज  पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. येत्या ४८ तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Aug 28, 2017, 11:27 AM IST

बीडमधील बिंदुसरा नदीवरील पर्यायी पूल वाहून गेला, वाहतूक वळवली

बीडमध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे बिंदुसरा नदीला पूर आलाय. या पुरात नदीवरील पर्यायी पूल वाहून गेला आहे. 

Aug 28, 2017, 08:21 AM IST

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय.

Aug 26, 2017, 10:10 PM IST

बाप्पाचं आगमन आणि जिल्ह्यात जोरदार पाऊस

 एकीकडे कोकणवासियांच्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालं असताना, दुसरीकडे वरुणराजानही रायगड जिल्ह्यात दमदार हजेरी लावली.

Aug 25, 2017, 08:08 PM IST

मुंबईच्या उपनगरांतही सुटीच्या दिवशी पावसाची धमाल

असल्फा मेट्रो स्टेशनच्या खाली पुन्हा एकदा पाणी तुंबल्याचं चित्र पाहावयास मिळतं आहे.

Aug 19, 2017, 12:17 PM IST

दीर्घ विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा एकदा पावसाचा जोर

मात्र मुंबईचा जोरदार पाऊस काही आठवड्यापासून गायब होता.

Aug 19, 2017, 11:30 AM IST

पाच तासांत महिन्याभराचा पाऊस, बंगळुरु जलमय

कर्नाटकची राजधानी जलमय झाली. विशेष म्हणजेअवघ्या पाच तासांच्या मुसळधार पावसाने शहर जलमय झाले.

Aug 16, 2017, 08:16 PM IST

आसाम, बिहारमध्ये पुराचे मोठे नुकसान, ११० जणांचा मृत्यू तर २२ लाख बेघर

आसाम आणि बिहारच्या काही भागांत पूरस्थितीचा मोठा परिणाम झाला आहे.  राज्यातील विविध राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतर पुराची स्थिती आहे. ११० जणांचा मृत्यू झालाय. तर २२ लाख लोक बेघर झालेत.

Aug 14, 2017, 01:43 PM IST

मराठवाडा पुन्हा दुष्काळाच्या छायेत, ४८ दिवसांपासून पावसाची दडी

मराठवाडा पुन्हा दुष्काळाच्या छायेत आहे. ४८ दिवसांपासून पावसानं दडी मारल्याने दुष्काळाचे संकट ओढवले आहे.  

Aug 11, 2017, 01:03 PM IST

मोदी पूरग्रस्त भागातील बचाव आणि पुनर्वनस कार्याचा घेणार आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये आलेल्या पुराचा आणि त्यानंतर सुरु असलेल्या बचाव आणि पुनर्वनस कार्याचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी आज सकाळीच ते गुवाहाटीला रवाना झाले. 

Aug 1, 2017, 08:38 AM IST