rape

ठाण्यात चिमुरड्यावर केले शिपायाने अत्याचार

सीनिअर केजीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर शाळेच्या शिपायानेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील एका इंग्रजी शाळेत उघडकीस आली आहे. या शिपायाला राबोडी पोलिसांनी अटक केली आहे.

Dec 17, 2013, 07:55 PM IST

दिल्ली पुन्हा गँग रेपने हादरली

दिल्लीतील उच्चभ्रू आणि मध्यवर्ती भाग असलेल्या कॅनॉट प्लेस या भागात आठ डिसेंबर रोजी एका अल्पवयीन मुलीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. अत्याचारानंतर नराधम पीडितेला पार्किंग लॉटमध्ये टाकून फरार झाले.

Dec 11, 2013, 03:47 PM IST

नारायण साईचे ८ महिलांशी शारीरिक संबंध

आसामार बापू यांचा मुलगा नारायण साई यांने आपला गुन्हा कबुल केला आहे. माझे ८ महिलांशी संबंध होते, अशी कबुली पोलीस तपासात नायायणने दिली आहे. हे संबंध त्यांच्या सहमतीने ठेवले होते, असा खुलासाही साईने केलाय.

Dec 11, 2013, 01:35 PM IST

योगाचे धडे देता-देता... परदेशी महिलेवर बलात्कार!

परदेशातून योगाचे धडे घेण्यासाठी भारतात दाखल झालेल्या एका परदेशी महिलेवर बलात्कार झाल्याची तक्रार नोंदविण्यात आलीय.

Dec 10, 2013, 05:33 PM IST

फरार नारायण साईला अखेर पंजाबमधून अटक...

गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आसारामपुत्राला अखेर अटक करण्यात आलीय. सुरतमधील बलात्कारप्रकरणी नारायण साईला पंजाबमधून अटक करण्यात आलीय.

Dec 4, 2013, 09:25 AM IST

फेसबुकवरून तरुणीची फसवणूक

फेसबूक हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. त्याचा प्रभाव चांगला पण होतो तसा वाईट ही होतो. ती दुधारी तलवार आहे. अशा दुधारी तलवारीने फसवणूक होण्याचे प्रकार वाढत आहेत.

Dec 2, 2013, 08:00 PM IST

बलात्कार करणाऱ्या नराधमाची गाढवावरून धिंड

चाकूचा धाक दाखवून इस्लामपूर मधील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडलीये. पिडीत मुलीचे हात पाय बांधून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आरोपी राहुल मानेला पकडलं आणि पीडित मुलीची सुटका केली. संतप्त नागरिकांनी आरोपी राहुल माने याची गाढवावरून धिंड काढली.

Nov 30, 2013, 03:57 PM IST

तब्बल ११ वर्ष केला बापानं मुलीवर बलात्कार

मुंबईमधली धक्कादायक बातमी आहे. बापानं स्वत:च्या मुलीवरच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीय. मुलगी अल्पवयीन असल्यापासून सतत ११ वर्षे तिच्यावर अत्याचार झाल्याचं पुढं आलंय.

Nov 29, 2013, 04:44 PM IST

मुंबईत ‘विनयभंग’ आणि ‘बलात्कारा’चं प्रमाण वाढलं!

आजकाल विनयभंगाचे आणि बलात्काराची प्रकरणं दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत. मुंबईची दिल्ली होतेय की काय? असंच काहीसं वाटू लागलं आहे. मुंबईत बलात्कार आणि विनयभंग सारख्या गुन्ह्यांत ५७ टक्क्यांनी वाढ झाली, हि धक्कादायक माहिती ‘प्रजा फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेनं केलेल्या पाहणीतून समोर आलीय.

Nov 22, 2013, 03:10 PM IST

फेसबुकवरून लव्ह, सेक्स आणि धोका

फेसबुकमुळे आपल्याला नवे-जुने मित्र भेटतात, त्यांच्याशी गप्पा मारता येते. आपल्या आठवणींना उजाळा मिळतो. तंत्रज्ञान हे तारक असते तसे ते मारकही असते. मुंबईच्या फॅशन डिझायनर तरुणीला फेसबुकवरील मैत्री फारच महागात पडली.

Nov 19, 2013, 05:12 PM IST

फक्त एक `मिस्ड कॉल` आणि तरुणीचं झालं लैंगिक शोषण!

एकेदिवशी चुकून तिचा "मिस्ड कॉल` त्याच्या मोबाईलवर गेला... तिने त्याची माफी मागितली. पण त्याने तिच्या मोबाईलवर नेहमीच फोन करून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. काही दिवसांनी फेसबुकवर बदनामी करण्याची भीती दाखवून तिच्यावर अत्याचार केले.

Nov 14, 2013, 09:24 PM IST

रंजीत सिन्हा यांना उपरती; आपल्याच वक्तव्याला दिला फाटा

‘सीबीआय’चे संचालक रंजीत सिन्हा यांनी ‘बलात्कारा’वर दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर सगळीकडून टीका झाली. त्यानंतर मात्र त्यांना यावर स्पष्टीकरण देण्याची उपरती सुचलीय.

Nov 13, 2013, 01:09 PM IST

`बलात्कार रोखता येत नसेल तर त्याचा आनंद घ्या`

सीबीआयचे संचालक रंजीत सिन्हा यांच्या ‘बलात्कार’ विषयीच्या मतांनी चांगलाच वादंग निर्माण केलाय. ‘बलात्कार रोखू शकत नसाल तर त्याचा आनंद घ्या’ असं वक्तव्य रंजीत सिन्हा यांनी एका पत्रकार परिषदेत केलंय.

Nov 13, 2013, 09:58 AM IST

वहिनीच्या मदतीनं दिराचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नळावर पाणी भरण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीला आपल्या घरी नेवून, बंदुकीच्या धाकावर धमकावून एका नराधमानं तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे यासाठी नराधमाच्या वहिनीनं या दृष्कृत्यात त्याला मदत केली.

Nov 12, 2013, 09:53 PM IST

चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुकलीवर बलात्कार

पालघर तालुक्यातील बोईसरमधील सुतारपाडा परीसरात एका सहा वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आलीय. ९ तारखेला सकाळी साडे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला.

Nov 11, 2013, 06:49 PM IST