rape

आझमींनी तोडले अकलेचे तारे, सून आयेशा टाकियाची टीका

बलात्कार प्रकरणांतील पीडितेलाही शिक्षा व्हायला हवी, असं धक्कादायक वक्तव्य करत अबू आझमींना आपल्या अकलेचे तारे तोडल्यानंतर त्यांची सून आणि अभिनेत्री आयेशा टाकियाने ट्‌विटरवरून टीका केली आहे.

Apr 11, 2014, 05:19 PM IST

तुमच्या घरी आया-बहिणी नाहीत का - राज ठाकरे

बलात्कार केलेल्यांना फाशी देणं चुकीचं आहे. या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. मुलायम सिंगांनी अकलेचे तारे तोडल्यानंतर राज चांगलेच भडकलेत. तुमच्या घरी आया-बहिणी नाहीत का, असा थेट हल्ला चढवत राज ठाकरे यांनी मुलायम सिंग यांच्यावर प्रखर टीका केली.

Apr 10, 2014, 09:48 PM IST

बलात्कार करणाऱ्याला फाशी कशाला द्यायला हवी- मुलायम

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी अकलेचे तारे तोडलेत. बलात्कार झाल्यावर फाशी कशाला द्यायला हवी, तरुणांकडून चुका होतात, असं संतापजनक वक्तव्य मुलायम सिंहांनी केलंय.

Apr 10, 2014, 05:36 PM IST

सावधान! सायनमध्ये सीरियल मोलेस्टर सक्रीय

पश्चिम उपनगरात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा सीरियल मोलेस्टर आता दक्षिण मध्य मुंबईत सक्रिय झाला आहे. त्यानं सायनमध्ये १३ वर्षीय शाळकरी मुलीला आपलं लक्ष्य केलं आहे.

Apr 9, 2014, 04:56 PM IST

मुंबईतील शक्तीमिल बलात्कार प्रकरणी आज शिक्षा सुनावणी

मुंबईच्या शक्तीमिल बलात्कार प्रकरणी तीनही आरोपींना कलम ३७६ ई च्या कलमाखाली दोषी ठरवण्यात आलंय. विजय जाधव, सलीम अन्सारी, कासीम बंगाली यांना या कलमा अंतर्गत दोषी ठरवण्यात आलंय. या आरोपींना आज सेशन कोर्टात शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

Apr 4, 2014, 11:44 AM IST

महिलेवर तीन वर्षांपूर्वी बलात्कार; डॉक्टरला अटक

दक्षिण दिल्लीच्या हौजखास भागात एका ४० वर्षीय महिलेवर एका डॉक्टरवर आणि त्याच्या सहकाऱ्यांनीवर बलात्कार केल्याच्या घटनेनं एकच गोंधळ उडालाय.

Apr 1, 2014, 06:28 PM IST

हेडमास्टरने केला पाच मुलींचा लैंगिक छळ

तुमच्या घरातील लहान मुली शाळेत जात असतील, तर ही बातमी वाचून तुम्हांला धक्का बसेल. पंजाबमधील संगरूर येथील मलेरकोटला येथील एका धार्मिक स्थळावर चालणाऱ्या एका शाळेच्या हेडमास्टरविरोधात पाच विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Mar 28, 2014, 09:51 PM IST

कवडास आश्रमातल्या गतिमंद मुलींवर पुन्हा बलात्कार

कवडास आश्रमातल्या गतिमंद मुलींवर पुन्हा एकदा बलात्कार झाल्याची घटना उघड झालीय. मानखुर्दच्या सुधारगृहात ही धक्कादायक बाब समोर आलीय.

Mar 24, 2014, 08:53 AM IST

बलात्कारानंतर महिलेची काढली धिंड

मध्य प्रदेशातील सांचीमध्ये एका बावीस वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला, एवढंच नाही तर नग्नावस्थेत या महिलेची गावामधून धिंड काढण्यात आली.

Mar 20, 2014, 08:06 PM IST

स्वत:च्या मुलीवर ३ वर्षापासून बलात्कार

आपल्या 21 वर्षीय मुलीवर सतत तीन वर्षे बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला राजस्थान पोलिसांनी अटक केली.

Mar 19, 2014, 08:24 PM IST

चार महिन्यांपासून १३ वर्षीय मुलीवर सतत बलात्कार

मुंबईतील परळ भागात एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर मागील चार महिन्यांपासून बलात्कार होत असल्याची घटना उघडकीस आलीय. भीतीपोटी या मुलीनं आपल्यावरील अत्याचाराबाबत मौन बाळगलं होतं. मात्र काल ज्यावेळी घरच्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

Mar 18, 2014, 11:33 AM IST

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नवी मुंबईमधील रबाळे परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आलीय. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना घडलीय.

Mar 16, 2014, 03:34 PM IST

धक्कादायक : एटीएम सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार

कोलकात्यातील हावडा इथल्या एका रहदारीच्या रस्त्यालगत असणाऱ्या एका एटीएम सेंटरमध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आलीय. ही महिला मनोरुग्ण असल्याचं समजतंय.

Mar 14, 2014, 11:22 AM IST

असहाय्यतेचा फायदा घेऊन `ती`च्यावर वारंवार बलात्कार

रत्नागिरी तालुक्यातील फणसोप परिसरातील बांगलवाडीत एका अपंग मुलीवर वांरवार सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय.

Mar 12, 2014, 10:00 AM IST

बलात्कार पीडितेची `टू फिंगर टेस्ट` बंद

बलात्कार पीडितेवर उपचारासाठी नवे दिशानिर्देश तयार करणाऱ्या केंद्रीय गृह मंत्रालयानं `टू फिंगर` परीक्षणाला अवैज्ञानिक ठरवलंय. ही पद्धत बेकायदेशीर ठरवत मंत्रालयानं हॉस्पीटलना पीडितांची फोरेन्सिक तसंच वैद्यकीय पडताळणीसाठी वेगळे रुम बनवण्याचे आदेश दिलेत.

Mar 5, 2014, 07:10 PM IST