घरगुती सिलिंडर गॅसचे दर पुन्हा वाढणार !
घरगुती सिलिंडर गॅसचे दर पुन्हा एकदा वाढण्याचे संकेत मिळत आहेत. दर निश्चित करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचे काम अंतिम टप्प्यात आलेय. त्यामुळे ही समिती नवे दर लागू करील. या समितीचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे. या अहवालावर विचारविनिमिय करून येत्या ३० सप्टेंबर रोजी गॅसच्या सुधारित दरांची घोषणा मोदी सरकार करण्याची शक्यता आहे.
Sep 11, 2014, 09:48 AM IST