sachin tendulkar

सचिन तेंडुलकरः वन डेतील महान फलंदाज

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने रविवारी वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. वन डे क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांना गवसणी घालणारा सचिन तेंडुलकर हा सर्वात महान फलंदाज आहे. त्यांच्यासारखा फलंदाज भविष्यात झाला नाही की भविष्यात होणार नाही.

Dec 23, 2012, 04:18 PM IST

सचिनची निवृत्ती , द्या तुमच्या प्रतिक्रिया

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर वन डे पाठोपाठ आता कसोटी क्रिकेटलाही अलविदा करत आहे. गेली २३ वर्षं विक्रमांचे उच्चांक गाठणारा सचिन होतोय निवृत्त

सचिनने आतापर्यंत केलेल्या देदिप्यमान कामगिरीला झी २४ तासचा मानाचा मुजरा.... तुम्हांला काय वाटते.... तुम्ही कसा कराल सचिनला कुर्नीसात.... कळवा तुमच्या प्रतिक्रिया...

Dec 23, 2012, 01:35 PM IST

सचिन तेंडुलकरचा वन-डे क्रिकेटला अलविदा

‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरने वन-डे क्रिकेटला अलविदा केला आहे.

Dec 23, 2012, 11:32 AM IST

खासदार सचिन विरोधातील याचिका फेटाळली

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने खासदारकीची शपथ घेतल्यानंतर खासदारकीवर प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं. सचिनला कशी काय खासदारकी दिली, असा प्रश्न उपस्थित करून खासदारकीला आव्हान देणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका दिल्ली उच्चन्यायालयाने फेटाळून लावली.

Dec 19, 2012, 02:25 PM IST

सचिन विनाकारण क्रिकेट सोडून नकोः विश्वनाथन आनंद

खराब फॉर्मशी लढत असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या बचावासाठी पाच वेळचा विश्व विजेता बुद्धीबळ खेळाडू ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद पुढे सरसावला आहे. सचिनला वाटते तोपर्यंत त्याने क्रिकेट खेळावे, असा सल्ला विश्वनाथन आनंदने दिला आहे.

Dec 17, 2012, 05:28 PM IST

सचिनचा ‘मास्टर’ स्ट्रोक ‘फ्लॉप’, निवृत्तीची चर्चा?

जगातील भल्या भल्या बॉलरला इंगा दाखवणारा ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरला सध्या अपयशाचा सामना करावा लागत आहे. सातत्याने येणारे अपयश यामुळे मास्टरवर टीका होत आहे. त्याला निवृत्तीचा सल्ला देण्यात येत आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील ७६ धावांची एक मात्र खेळी वगळता सचिनची बॅट म्यान झाली आहे. सचिनच्या निवृत्तीची चर्चा ‘जोरात’ असून पत्नी नागपुरात दाखल झाल्यामुळे या चर्चेला उधाण आलंय.

Dec 17, 2012, 03:04 PM IST

सचिनने सन्मानाने निवृत्ती घ्यावी - नाना पाटेकर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या चाहत्यांच्या मनात राजा आहे, आणि म्हणून निवृत्ती बद्दल त्यानं स्वत:च विचार करावा असं मत सिने अभिनेता नाना पाटेकर यानं व्यक्त केलय.

Dec 17, 2012, 08:18 AM IST

सचिनने आत्ममंथन करावे- अक्रम

www.24taas.com, नवी दिल्ली
सचिन तेंडुलकर सारख्या महान खेळाडूला निवृत्ती घे, असे सांगणे निवडकर्त्यांना कठीण आहे. परंतु, या महान खेळाडूने या संदर्भात स्वतः निर्णय घेणे गरजेचे आहे.

Dec 12, 2012, 03:58 PM IST

सचिनचा नवा रेकॉर्ड, ३४ हजाराला गवसणी

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं 34 हजार रन्स पूर्ण केले आहेत.

Dec 5, 2012, 04:41 PM IST

सचिन, युवीने सावरले

गेल्या अनेक इनिंगपासून चाहत्यांना ज्या इनिंगची अपेक्षा होती तशी इनिंग सध्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खेळत असून तो सध्या ५७ धावांवर खेळत आहे. तर दुसऱ्या बाजूला त्याची झुंजार खेळाडू युवराज सिंग त्याला चांगली साथ देत आहे.

Dec 5, 2012, 02:24 PM IST

...जेव्हा सचिन तेंडुलकरला भेटला ओसामा

नावात काय आहे असे म्हटले जाते, पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला एका अशा घटनेला सामोरे जावे लागले की त्याला म्हणावे लागले नावातच काही तरी खास आहे.

Dec 3, 2012, 04:32 PM IST

सध्या टीम इंडियाला सचिनची जास्त गरज - द्रविड

खराब फॉर्मच्या चक्रव्युहात अडकलेल्या सचिनवर निवृत्तीसाठी दबाव दिसून येतोय. पण भारतीय टीमची वॉल असलेल्या राहुल द्रविडला मात्र तसं वाटत नाही. राहुलच्या मते, टीम इंडियाल आत्ता खरी सिनीअर खेळाडूची गरज आहे.

Nov 28, 2012, 03:29 PM IST

रागावलेल्या बायकोचा सामना करणं महाकठिण - सचिन

सचिन तेंडुलकरनं आपल्या बॅटींगनं भल्याभल्यांची दाणादाण उडवलीय पण बॅटींगपेक्षा रागावलेल्या पत्नीचा सामना करणं कठीण असल्याचं मास्टर ब्लास्टरला वाटतंय

Nov 23, 2012, 06:38 PM IST

द्रविडच्या हस्ते ‘बॉर्न टू बॅट’चं प्रकाशन...

‘बॉर्न टू बॅट’ या पुस्तकाचं नुकतंच मुंबईत उद्घाटन झालंय. क्रिकेटचा बादशाह सचिन तेंडूलकर याच्या कारकीर्दीवर या पुस्तकात प्रकाश टाकलाय.

Nov 23, 2012, 04:25 PM IST

सेहवागचे वादळी शतक, पण सचिन झटपट बाद

इंग्लंडविरुद्धच्या अहमदाबाद कसोटीत वीरेन्द्र सेहवागने शानदार शतक ठोकलं आहे. तब्बल दोन वर्षांनंतर त्याने हे कसोटी शतक साजरं केलं आहे. सेहवागच्या या धडाकेबाज शतकामुळे भारताची स्थिती मजबूत झाली आहे.

Nov 15, 2012, 02:21 PM IST