Jasprit Bumrah : चॅम्पियन्स ट्रॉफीला आता जवळपास एक आठवडा शिल्लक असताना भारताचा स्टार क्रिकेटर जसप्रीत बुमराह याच्या फिटनेसबाबत अजूनही शंका आहे. बीसीसीआय बुमराहबाबत घाईत कोणताही निर्णय घेऊ इच्छित नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बुमराहच्या खेळण्यावर संशय असला तरी बीसीसीआय बुमराहबाबत निर्णय घेण्यापूर्वी प्रतीक्षा करेल. बुमराह स्पर्धेत नसल्यामुळे भारताच्या गोलंदाजीच्या बाजूवर फरक पडेल. बुमराहला सिडनीमध्ये बॉर्डर गावसकर ट्रॉफी दरम्यान पाचव्या टेस्टमध्ये पाठीला दुखापत झाली होती. आता पुढील काही दिवस जसप्रीत बुमराह रिहॅबमध्ये राहून आपल्या फिटनेसवर काम करेल.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार जसप्रीत बुमराह बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये त्याचे रिहॅबिलिटेशन सुरु करण्याच्या तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बुमराहचा पाठीचा स्कॅन करण्यात आलेला आहे. पुढील 24-48 तासांमध्ये गोलंदाजीसह इतर फिजिकल एक्टिविटी सुद्धा आहेत. जसप्रीत लवकरच हे सगळं सुरु करण्याची शक्यता आहे त्यामुळे ही भारतीय संघासाठी एक चांगली बातमी आहे.
भारत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडण्यात आलेल्या संघात 11 फेब्रुवारीपर्यंत बदल करू शकतो. बीसीसीआय बुमराहला खेळण्यासाठी संधी देण्याकरता शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिलं. बीसीसीआयने हार्दिक पंड्या सोबत सुद्धा असे केले होते जेव्हा तो वनडे वर्ल्ड कप 2023 दरम्यान दुखापत ग्रस्त झाला होता.
हेही वाचा : रोहित शर्माने मॅच जिंकल्यावर ओडिशाच्या CM सोबत केलं असं काही, फॅन्स पाहतच राहिले Video Viral
टाईम्स ऑफ इंडियाच्या सूत्रांनी म्हटले आहे की, 'जर एक टक्का देखील शक्यता असेल तरी बीसीसीआय वाट पाहिलं. त्याने हार्दिक पंड्या सोबत सुद्धा असे केले होते, त्यांनी त्याच्याकरता दोन आठवडा वाट पाहिली होती. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाला रिप्लेसमेंट म्हणून आणण्यात आले. शुभमन सुद्धा जेव्हा डेंग्यूमुळे आजारी होता तेव्हा सुद्धा त्याच्या रिप्लेसमेंटचा विचार लगेच करण्यात आलेला नव्हता. या दोन्ही घटना टूर्नामेंट दरम्यानच झाल्या होत्या. तेव्हा बुमराहबाबत सुद्धा असेच काहीसे केले जाण्याची शक्यता आहे. अंतिम संघ सादर केल्यानंतर, जसप्रीत पुन्हा बारा होऊ शकला नाही तर मिळवू शकला नाही तर बीसीसीआय इवेंट टेक्निकल कमेटीकडून बदली मागू शकतो'.
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा