sachin tendulkar

सचिनला नाही १०० क्र. आसन, रेखापासून दूर जया बच्चन

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर राज्यसभेत १०३ क्रमांकाच्या सीटने आपल्या राजकीय खेळीची सुरूवात करणार आहे. विजय माल्या आणि शेतीशास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन यांच्यामधली जागा मास्टर ब्लास्टरला देण्यात आली आहे.

May 4, 2012, 08:59 PM IST

सचिन जगभरातल्या चाहत्यांच्या भेटीला

जगातल्या सहा शहरांमधील चाहत्यांना आपल्या लाडक्या सचिन तेंडुलकरसोबत संध्याकाळ घालवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. फिडेलिस वर्ल्ड ग्रुपतर्फे पुढील तीन वर्षं ही सेलब्रेशन सिरीज आयोजित करण्यात आली आहे.

May 2, 2012, 04:09 PM IST

सचिनला मुंबईसाठी वेळ आहे का?

सचिनकडे मुंबईसाठी वेळ नसल्याची खंत माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी व्यक्त केलीय. महाराष्ट्र दिनीनिमीत्त मुंबईच्या अठरा माजी महापौरांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.

May 1, 2012, 01:03 PM IST

अमिताभ,रेखा करणार सिलसिला पार्ट-२!

रुपेरी पडद्यावरील सुपरहिट जोडी अमिताभ आणि रेखा पुन्हा आपल्याला एकत्र दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चांगली कथा असल्यास आम्ही दोघं एकत्र काम करू शकतो अशी तयारी स्वतः बिग बी यांनी दर्शविली आहे. त्यामुळे सिलसिला पार्ट-२ लवकरच येण्याची शक्यता वाढली आहे.

Apr 29, 2012, 12:14 PM IST

बिग बींच्या रेखा, सचिनला शुभेच्छा

अभिनेत्री रेखा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला राज्यसभेसाठी नामनियुक्त सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल महानायक अमिताभ बच्चन यांनी दोघांचे अभिनंदन केले आहे. दोन्ही खासदारपदासाठी लायक असल्याचेही बिग बी यांनी म्हटले आहे

Apr 29, 2012, 11:07 AM IST

सचिनच्या खासदारकीने मांजरेकर हैराण

देशात बदल घडवण्याइतका वेळ तरी तो राज्यसभेला नक्कीच देऊ शकतो. पण सचिन खूपच साधा आहे. तो क्रिकेटचे प्रश्नही राज्यसभेत मांडू शकणार नाही." असं मांजरेकर म्हणाले

Apr 27, 2012, 07:10 PM IST

सचिनने ऑफर स्वीकारली, रेखाही खासदार

विक्रमादित्य मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने खासदारकीची ऑफर स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली. सचिन तेंडूलकरला राज्यसभेचे सदस्यत्व देण्यासंबंधी पंतप्रधान कार्यालयाने गृहमंत्रालयाला पत्र पाठवले होते. यावर राष्ट्रपतींचीही मोहर उमटली. सचिनबरोबरच ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आणि उद्योगपती अनु आघा यांच्या नावाचीही शिपारस करण्यात आली होती. रेखानेही खासदारकी स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Apr 27, 2012, 08:50 AM IST

सचिन खासदार होणार?

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सचिनसमोर राज्यसभेच्या खासदारकीचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. स्पोर्टसच्या कोट्यातून नामनियुक्त सदस्य म्हणून सचिनने खासदार व्हावे, असा हा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

Apr 27, 2012, 08:40 AM IST

सचिनने घेतली सोनियांची भेट

मा्स्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं १० जनपथवर सोनिया गांधीचीं भेट घेतली आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन पत्नी अंजलीसह सोनियांच्या भेटीला गेला होता. त्यामुळे या भेटीमध्ये कशावर चर्चा झाली याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Apr 26, 2012, 02:23 PM IST

सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

सचिन रमेश तेंडुलकर. भारतीय क्रिकेटला पडलेलं एक सुखद स्वप्न. १५ नोव्हेंबर १९८९ला सचिननं पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच खेळली. तेव्हापासून आजतागायत तो भारतीय क्रिकेटची अविरत सेवा करतो आहे.

Apr 24, 2012, 07:50 AM IST

सचिनचे ४० व्या वर्षात पदार्पण

आपला लाडक्या सचिननं आज 40 व्या वर्षात पदार्पण केलंय.. गेल्या 23 वर्षांत सचिननं क्रिकेटमध्ये बॅटिंगच जवळपास सर्व रेकॉर्ड आपल्या नावावर केलेय...मैदान असो मैदानाबाहेर सचिननं आपल्या कामगिरीनं सर्वांचीच मन जिंकलंय.

Apr 24, 2012, 12:03 AM IST

किंग्ज इलेव्हन पंजाबचा विजय

मुंबई इंडियन्सने १६३ रन्स काढून किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर १६४ धावांचं आव्हान उभं केलं आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब ने सुरूवात तरी चांगली केली आहे. मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यामध्ये मुकाबला रंगला आहे.

Apr 23, 2012, 08:59 AM IST

सचिन तेंडुलकर खेळणार!

आघाडीच्या फलंदाजांच्या अपयशामुळे अडचणीत सापडलेल्या मुंबई इंडियन्स संघाची सर्व आशा आता सचिन तेंडुलकरवर केंद्रीत झाली आहे. सचिन पुनरागमन करेल आणि भरकटत चाललेल्या संघाच्या होडीला यशस्वीपणे पैलतीर गाठून देईल, अशी मुंबई इंडियन्सला आशा आहे. मुंबई इंडियन्सला रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

Apr 23, 2012, 08:58 AM IST

सचिनचा बोट काळानिळा, खेळणे अनिश्चित!

आयपीएलच्या पहिल्‍या मॅचमध्ये बोटाच्या दुखापतीने जायबंदी झालेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची जखम अजूनही बरी झालेली नाही. आज विशाखापट्टणम येथे होणाऱ्या डेक्‍कन चार्जर्स विरूद्धच्‍या सामन्‍यात सचिनच्‍या खेळण्‍याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

Apr 9, 2012, 03:42 PM IST

सचिनपेक्षा खूप मोठा सलमान - केआरके

उथळ वागणं आणि वायफळ बडबड यामुळे सोशल नेटवर्कींग साइटवर फेमस झालेला केआरके म्हणजे कमाल आर खान याने आता पुन्हा एका मुक्ताफळे उधळली आहेत. हे महाशय म्हणत आहेत की सलमान खान हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपेक्षा खूप मोठा आहे.

Mar 27, 2012, 06:54 PM IST