Dhruv Rathi on Ranveer Allahbadia: कॉमेडियन समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लेटेंट' आणि युट्यूबर रणवीर अलाहबादिया यांच्या अश्लील कमेंट्सवरुन सध्या वाद पेटला आहे. सोशल मीडियावरुन रणवीर अलाहबादियावर जोरदार टीका होत आहे. रणवीर अलाहबादियाने आई-वडिलांच्या शरीरसंबंधावरुन केलेल्या विधानामुळे संताप व्यक्त होत आहे. यादरम्यान युट्यूबर ध्रुव राठीने या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ध्रुवने अशा प्रकारच्या आक्षेपार्ह कंटेंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून, हा मूर्खपणा असून चांगला कंटेंट तयार करण्यासाठी क्रिएटर्सवर दबाव असल्याचं सांगितलं. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, ध्रुव राठी जगातील प्रसिद्ध युट्यूबर्सपैकी एक आहेत. तसंच रणवीर कंटेंटच्या बाबतीत त्याला आपला गुरु मानतो.
ध्रुव राठीने एक्सवर पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे. त्याच्या मते अशा कंटेंटवर बंदी आणणं योग्य नाही. यामुळे चांगला कंटेंट तयार करणाऱ्यांनाही फटका बसला असेल. तसंच आपण शिव्या देणाऱ्यांचं अजिबात समर्थन करत नसल्याचंही सांगितलं आहे.
ध्रुवने लिहिलं आहे की, "मी नेहमीच शिव्या आणि अश्लील भाषेच्या विरोधात राहिलो आहे. मी 1000 पेक्षा जास्त व्हिडीओ, शॉर्ट्स आणि रील बनवल्या आहेत. त्यात तुम्हाला एकही शिवी दिसणार नाही".
I’ve always been strongly against abusive and vulgar language. In the 1000+ videos, shorts and reels that I have made, you won’t find a single abusive word for anyone.
What is being done today in the name of dank comedy is pure nonsense. The only purpose is to shock and disgust…
— Dhruv Rathee (@dhruv_rathee) February 10, 2025
"आजकाल कॉमेडीच्या नावे जे काही केलं जात आहे, ते पूर्णपणे बकवास आहे. याचा एकमेव उद्देश प्रेक्षकांना शॉकमध्ये टाकणं आहे. ज्याचा आपल्या तरुण लोकसंख्येच्या मानसिक विकासावर उलटा प्रभाव पडत आहे. ते विनाशाच्या दिशेने जात आहेत. पण यासाठी कोणत्याही प्रकारच्या बंदीची मागणी करणं तोडगा नाही. कारण यामुळे कडक सेन्सॉरशिप सुरु होऊ शकते. याउलट आपण चांगला कंटेंट बनवण्यासाठी क्रिएटर्सवर दबाव टाकण्याची गरज आहे," असं तो म्हणाला आहे.
"इंडियाज गॉट लेटंटसारखे शो समाजाच्या नैतिकतेवर अॅनिमल चित्रपटाप्रमाणे प्रभाव टाकतो. यासाठी त्यांच्याविरोधात कडक शब्दांत आवाज उठवण्याची गरज आहे," असं मतही त्याने मांडलं आहे.
ध्रुव राठीची गणना चांगल्या युट्यूबर्समध्ये केली जाते. तो नेहमीच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे मुद्दे उचलत असतो. अनेक युट्यूबर्स त्याला आपला आदर्श मानतात.
इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला विचारलं की, "तुम्ही आयुष्यभर तुमच्या पालकांना दररोज सेक्स करताना पाहाल की एकदा सामील होऊन ते कायमचे थांबवाल?". हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यानंतर नेटकऱ्यांनी अलाहबादियावर टीका केली. त्याच्याविरुद्ध अनेक पोलीस तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्याचे इंस्टाग्रामवर 4.5 दशलक्ष फॉलोअर्स आणि 1.5 कोटी युट्यूब सबस्क्रायबर्स आहेत.
31 वर्षीय रणवीर अलाहबादियाने एक्सवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्याने कॅप्शन दिली आहे की, "इंडियाज गॉट लॅटंटमध्ये मी जे काही म्हणलं तो बोलायला नको होतं. मी माफी मागतो". व्हिडीओमध्ये रणवीर अलाहबादिया सांगत आहे की, "माझी टिप्पणी अजिबात योग्य नव्हती. ती मजेशीरही नव्हती. विनोद हा माझा पिंड नाही, मी फक्त माफी मागण्यासाठी आलो आहे".
I shouldn’t have said what I said on India’s got latent. I’m sorry. pic.twitter.com/BaLEx5J0kd
— Ranveer Allahbadia (@BeerBicepsGuy) February 10, 2025
रणवीर अलाहबादियावर टीका करताना अनेकांनी त्याला अशाप्रकारे या प्लॅटफॉर्मचा वापर करणं योग्य आहे का? अशी विचारणा केली आहे. त्यावर भाष्य करताना तो म्हणाला की, "अर्थातच मी या प्लॅटफॉर्मचा वापर अशा प्रकारे करू इच्छित नाही. जे काही घडले त्यामागे मी कोणताही संदर्भ, औचित्य किंवा तर्क देणार नाही. मी फक्त माफी मागण्यासाठी आलो आहे. वैयक्तिकरित्या माझा निर्णय घेण्यात चूक झाली. माझ्याकडून ते कूल नव्हतं".
"हा पॉडकास्ट सर्व वयोगटातील लोक पाहतात, मी अशी व्यक्ती बनू इच्छित नाही जी ती जबाबदारी गांभीर्याने घेणार नाही. मी कधीही कुटुंबाचा अनादर करणार नाही," अशीही बाजू त्याने मांडली आहे.