'ना अमिताभला अभिनय येतो, ना रजनीकांतला...', एकत्र काम केलेल्या अभिनेत्याने उघड केलं सत्य, म्हणतो...

Alencier Ley Lopez Criticises Amitabh Rajinikanth: अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्याने या दोघांचं असे सत्य सांगितलंय की, ते काही मिनिटांमध्ये व्हायरल झालं आहे.     

नेहा चौधरी | Updated: Feb 10, 2025, 09:28 PM IST
'ना अमिताभला अभिनय येतो, ना रजनीकांतला...', एकत्र काम केलेल्या अभिनेत्याने उघड केलं सत्य, म्हणतो... title=

Alencier Ley Lopez Criticises Amitabh Rajinikanth :  अभिनयाचे मास्टर म्हटलं की, अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हे डोळे समोर येतात. अमिताभ बच्चन आणि रजनीकांत याचा एक मोठा असा चाहत्या वर्ग आहे. आजही त्यांच्या चित्रपट पाहण्यासाठी चाहते गर्दी करतात. दोन्ही स्टार हे वर्षानुवर्ष चाहत्यांचा मनावर आणि चित्रपटसृष्टीवर राज करत आहेत. पण अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्यासोबत काम करणाऱ्या एका अभिनेत्याने त्यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलंय. त्या अभिनेत्याचा वक्तव्यामुळे एकच खळबळ माजली आहे. हा अभिनेता आहे, 'वेट्टाय्यान' या अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपटातील अभिनेता अलेन्सियर ले लोपेझने. याने अमिताभ असो रजनीकांत या दोघांसोबत काम केलंय. त्याने केलेलं वक्तव हे सोशल मीडियावर काही क्षणात व्हायरल झालंय. 

काय म्हणाला अभिनेता?

2024 मध्ये आलेल्या 'वेट्टाय्यान' चित्रपटात लॅन्सियर ले लोपेझने एक छोटीशी भूमिका साकारली होती. ही भूमिका न्यायाधीशाची होती. या चित्रपटाबद्दल बोलताना लोपेझ म्हणाले की, माझा सीन एका दिवसात मुंबईत चित्रित होणार होता. मला मुंबईला जाण्यासाठी विमानाचे तिकीट देण्यात आले आणि एका पंचतारांकित हॉटेलमध्ये माझ्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. मला एका झटक्यात न्यायाधीश म्हणून बसावे लागले. अमिताभ बच्चन आणि रजनीकांत सर समोर होते.

ते म्हणाले की, 'माझ्या कॉलेजच्या काळात, मी रजनी सरांना दातांनी हेलिकॉप्टरचे फिरणारे ब्लेड थांबवताना पाहिले होते. म्हणूनच मी त्याचा अभिनय पाहण्यासाठी खूप उत्सुक होतो. 'वेट्टाय्यां'च्या सेटवर एका शॉट दरम्यान मी त्याला अभिनय करताना पाहिले. त्याची देहबोली पाहिली आणि तो कोर्टरूममधून बाहेर पडताना दिसले. या शॉटमध्ये अमिताभ बच्चन यांना सिंहासारखे गर्जना करत यावे लागले आणि मला धक्का बसल्यासारखे वागावे लागले.

या दोघांना अभिनय...

मग मला जाणवले की मी त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही. मला स्टाईलबद्दल जास्त माहिती नाही. मला जाणवले की आपण फक्त दिलीश पोथन, शरण वेणुगोपाल आणि राजीव सारख्या चित्रपटांमध्येच काम करू शकतो. पण, त्या क्षणी मला वाटले की, त्या दोघांनाही अभिनय येत नाही. तुम्हाला सांगतो की, 'वेट्टाय्यान' हा चित्रपट टीजे ज्ञानवेल यांनी दिग्दर्शित केला होता. यामध्ये रजनीकांत यांनी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट अमिताभ बच्चन यांचा तमिळ चित्रपटातील पहिला चित्रपट होता. या चित्रपटाने जगभरात 253 कोटी रुपये कमावले होते.