विराटची उडी तिसऱ्या स्थानावर
आयसीसीच्या ताज्या रँकिंगमध्ये विराट कोहलीने जबरदस्त कामगिरी करत ८४६ अंकांसह तिसऱ्या स्थानावर धडक मारली आहे. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आपल्या क्रमवारीत सुधारणा करून चौथ्या स्थानावर गेला आहे.
Mar 27, 2012, 03:51 PM ISTकोकाकोलाच्या कॅनवर सचिनची छबी
कोकाकोला इंडिया सचिन तेंडुलकरच्या शंभराव्या विश्वविक्रमी शतक साजरं करण्यासाठी त्याची छबी असलेले ७.२ लाख गोल्डन कॅन्सची निर्मिती करणार आहे. सचिनने नुकत्याच झालेल्या एशिया कपच्या सामन्यात बांग्लादेशाच्या विरुध्द १०० विश्वविक्रमी शतकं फटकावलं.
Mar 25, 2012, 10:50 PM ISTसचिनची टीकाकारांवर शाब्दिक फटकेबाजी!
निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या टीकाकारांना सचिन तेंडुलकरने आज पहिल्यांना बॅटने नाही तर तोंडाने प्रत्युत्तर दिले आहे. ' जे मला निवृत्तीचा सल्ला देतात , त्यांनी मला क्रिकेट शिकविलेले नाही. जेव्हा मला मैदानावर उतरल्यानंतर क्रिकेट खेळण्यात उत्साह वाटणार नाही , तेव्हा मी क्रिकेट सोडणार त्यामुळे टीकाकारांनी मला सल्ला देऊ नये, अशी तुफान शाब्दिक फटकेबाजी केली आहे.
Mar 23, 2012, 06:25 PM ISTसचिनने निवृत्ती का पत्करावी?- लता मंगेशकर
सचिनने निवृत्ती का पत्करावी हा सवाल आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचा...सचिनने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विश्वविक्रमी शंभरावे शतक झळकावल्यामुळे लता मंगेशकरांना आनंद झाला आहे. पण त्याचबरोबर सचिनने आता निवृत्त व्हावं असं सूचवलं जात असल्यामुळे त्या नाराजही आहेत.
Mar 20, 2012, 04:35 PM ISTबांग्लादेशच्या पंतप्रधानांकडून सचिनचा गौरव
सचिन तेंडुलकर हा संपूर्ण भारतीय उपखंडाची शान आहे, असं वक्तव्य बांग्ला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी केलं. सचिन तेंडुलकरच्या महाशतकी खेळानंतर त्याला गनोभाबन या बांग्ला देशाच्या पंतप्रधान निवासस्थानी आमंत्रित करण्यात आले होते.
Mar 20, 2012, 09:55 AM ISTएकमेवाद्वितीय सचिन
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आपल्या बॅटनं अनेक रेकॉर्ड केले आहेत. क्रितकेटमधील ही रनमशिन आपल्या करिअरच्या अत्युच्च शिखरावर आहे. आपल्य़ा क्रिकेट करिअरमध्ये त्यानं अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
Mar 17, 2012, 02:58 AM ISTसचिन एक परिकथा आहे - नाना पाटेकर
सचिन निश्चतच आदर्शवत आहे आणि क्रिकेटच्या खेळाडूंसाठी तो कायम आदर्शच राहिल. सचिन एक मिथ आहे, तो दंतकथा बनला आहे. सचिन एक परिकथा बनून राहिला आहे.
Mar 16, 2012, 09:04 PM ISTसचिनच्या सर्वोत्कृष्ट शतकी खेळी....
सचिन तेंडुलकरने मिरपूरच्या मैदानावर शंभरावे शतक झळकावत नवा इतिहास घडवला. जगभरातील सचिनचे चाहते ज्या क्षणांची गेली वर्षभर प्रतिक्षा करत होते तो प्रत्यक्षात अवतरला. सचिनच्या शंभर शतकांमधील सर्वोत्कृष्ट शतकं निवडणं म्हणजे अलिबाबाच्या खजिन्यातील रत्नभांडारातील मूल्यवान रत्नं शोधण्याचा प्रयत्न करणं. सचिनच्या सर्व शतकी खेळी सरस आहेतच पण तरीही त्यातील काही संस्मरणीय शतकांचा हा आढावा.
Mar 16, 2012, 06:46 PM ISTसचिनचा महाशतकापर्यंतचा प्रवास....
विक्रमादित्य सचिन तेंडुलकर याने १९९० मध्ये पहिले शतक झळकावले होते. तिथपासून आजपर्यंत त्याने क्रिकेट रसिकांना भरभरून आनंद देत महाशतकापर्यंत मजल मारली आहे. पाहूया त्याच्या सेंच्युरींची यादी....
Mar 16, 2012, 06:35 PM ISTमहाशतकोत्सव !!!
सचिन तब्बल एक वर्षापासून ९९च्या फेऱ्यात फसला होता.नागपूरला वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सचिननं ९९ वी आंतरराष्ट्रीय सेंच्युरी झळकावली होती. त्यानंतर १३ मार्च २०११पासून सुरू झालेली महासेंच्युरीची अखेर प्रतिक्षा आज संपली.
Mar 16, 2012, 06:34 PM IST‘ट्विटर’वर सचिनचे अभिनंदन
क्रिकेटचा बादशहा, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला तब्बल एक वर्ष शतकाची हुलाकावणी. केवळ एका शतकाने होणार होते महाशतक...जगभरातील सर्व क्रिकेट चाहत्यांनी ज्या शतकाची प्रतिक्षा केली होती. अखेर ते सचिनचे महाशतक मिरपूरमधील शेर-ए-बांगला मैदानावर साजरे झाले आणि वर्षभर लांबलेली महाशतकाची प्रतिक्षा संपली. सचिनवर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. सोशल साईटवर तर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्यापैकी ‘ट्विट’वरील काही निवडक संदेश..
Mar 16, 2012, 06:26 PM ISTसचिनचं विश्वविक्रमी द्विशतक 'टाइम्स'मध्ये
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वन-डे सामन्यात द. आफ्रिकेविरुद्ध झळकावलेल्या द्विशतकी कामगिरीचीची नोंद टाइम्स मॅगझिनच्या ‘ टॉप टेन स्पोर्टस् मोमेन्ट्स ’ मध्ये घेण्यात आली आहे.
Mar 16, 2012, 05:49 PM ISTबांग्लादेशविरुद्ध सामन्यासाठी सचिनचा सराव
सचिन तेंडुलकर आपल्या सरावाकडे पूर्ण लक्ष देत आहे. संघातील इतर खेळाडू जेव्हा प्रॅक्टिस चुकवून आराम करत होते, त्यावेळी सचिन मैदानावर बॉलिंगचा सराव करत होता.
Mar 16, 2012, 08:18 AM IST...तरीही, सचिन टॉपवरच
वर्षभरापासून सचिनला सेंच्युरींची सेंच्युरी झळकावण्यात अपयश आलं आहे. असं असलं तरी,भारताकडून २०११ सीझनमध्ये टेस्टमध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्या भारतीय प्लेअर्समध्ये त्याचा नंबर टॉपवर असलेल्या विराट कोहलीनंतर लागतोय.
Mar 13, 2012, 01:30 PM ISTक्रिकेट निवृत्तीचा सचिनकडून इन्कार
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, सचिनने क्रिकेट निवृत्तीचा इन्कार केला आहे.
Mar 10, 2012, 09:24 PM IST