VIDEO : कोण आहे ती मुलगी जिच्यासाठी विराट कोहलीने भेदली सुरक्षाव्यवस्था, सर्वांसमोर मिठीत घेतलं

IND VS ENG 3rd ODI : टीम इंडियाने सीरिजमध्ये 2-0 अशी विजयी आघाडी सुद्धा घेतली. आता भारत - इंग्लंड सीरिजमधील तिसरा सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 

पुजा पवार | Updated: Feb 11, 2025, 05:53 PM IST
VIDEO : कोण आहे ती मुलगी जिच्यासाठी विराट कोहलीने भेदली सुरक्षाव्यवस्था, सर्वांसमोर मिठीत घेतलं  title=
(Photo Credit : Social Media)

IND VS ENG 3rd ODI : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) पूर्वी टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची वनडे सीरिज खेळत आहे. या सीरिजचा दुसरा सामना कटक येथे पार पडला ज्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 4 विकेट्सने पराभव केला. यासह टीम इंडियाने सीरिजमध्ये 2-0 अशी विजयी आघाडी सुद्धा घेतली. आता भारत - इंग्लंड (India VS England) सीरिजमधील तिसरा सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यासाठी टीम इंडिया जेव्हा भुवनेश्वर एअरपोर्टवर पोहोचली तेव्हा विराट कोहलीने (Virat Kohli) असं काही केलं ज्याचा कोणालाही अंदाज नव्हता. 

विराट कोहली आणि टीम इंडिया जिथे जिथे जाते तिथे आपल्या आवडत्या खेळाडूंच्या स्वागतासाठी आणि त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने गर्दी करतात. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेसाठी मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाते, जेणेकरून कोणताही व्यक्ती त्यांच्या पर्यंत पोहोचू नये. विराट कोहलीला भेटण्यासाठी बऱ्याचदा त्याचे फॅन्स ही सुरक्षा व्यवस्था तोडून जाताना दिसतात. पण भुवनेश्वर एअरपोर्टवर चक्क विराट कोहलीने सुरक्षा व्यवस्था तोडून एका महिलेची गळाभेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यानंतर ही महिला नेमकी कोण आहे याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकतता निर्माण झाली. 

कोण आहे ती महिला? 

व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे विराट कोहलीने जेव्हा एअरपोर्टवर एंट्री केली तेव्हा चाहते त्यांना पाहून जल्लोष करत होते. तेथून जात असताना विराटने गर्दीत एका महिलेला पाहिलं आणि तो आश्चर्यचकीत झाला. तो जवळची सुरक्षा भेदून त्या महिलेकडे गेला तिला मिठी मारली आणि मग दोघांमध्ये काही शब्दांचा संवाद झाला, मग विराट पुन्हा संघासोबत पुढे गेला. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की विराटने ज्या महिलेची गळाभेट घेतली ती त्याची जवळची नातेवाईक आहे. परंतु याबाबत अधिकृत अशी माहिती समोर आलेली नाही. परंतु हे नक्कीच की विराट त्या महिलेला खूप चांगलं ओळखत होता कारण त्याने सुरक्षेची पर्वा  न करता तो महिलेकडे गेला होता. 

हेही वाचा : 'तो सगळ्यांना नागडं करून....'; रोहित शर्माबद्दल हे काय बोलून गेला प्रसिद्ध अभिनेता

विराटचा खराब फॉर्म : 

गुडघ्याला सूज आल्यामुळे विराट कोहली इंग्लंड विरुद्ध सीरिजच्या पहिल्या सामन्यात खेळला नव्हता. तर दुसऱ्या सामन्यात प्लेईंग 11 मध्ये संधी मिळवूनही तो संघासाठी दोन अंकी धावा सुद्धा करू शकला नाही. विराट कोहली मागील काही महिन्यांपासून खराब फॉर्ममधून जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावसकर सामन्यातही त्याने पहिल्या सामन्यात शतक ठोकले खरे पण त्यानंतर उर्वरित 4 सामन्यात त्याला समाधानकारक धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी फॉर्ममध्ये कमबॅक करण्यासाठी अहमदाबाद येथे 12 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणारा शेवटचा वनडे सामना विराटसाठी महत्वाचा असणार आहे.