जेवणाची चव वाढवण्यासाठी ट्राय करा खसखसची चटणी; आरोग्यसाठी ठरेल वरदान

Poppy seeds: जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या खायला आवडत असतील, तर एकदा खसखसची चटणी नक्कीच ट्राय करा. ही चटणी केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

Updated: Feb 11, 2025, 05:11 PM IST
जेवणाची चव वाढवण्यासाठी ट्राय करा खसखसची चटणी; आरोग्यसाठी ठरेल वरदान title=

Kitchen Food Tips: भारतीय स्वयंपाकात चटणी ही साइड रोलमध्ये असली तरी अगदी महत्त्वाची भूमिका बजावते. तिची चव इतकी अप्रतिम असते की मुख्य भाजीचीही चव तिच्यासमोर कधीकधी फिकी वाटते. जर तुम्हाला चटणी खायला आवडत असेल, तर आजच ही खसखस चटणी रेसिपी ट्राय करा. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खसखस खाणे शरीरासाठी फायद्याचे असते. खसखस प्रथिने, फायबर आणि हेल्दी फॅट्सने भरलेली असते. महाराष्ट्रात खसखसची चटणी मोठ्या आनंदाने खाल्ली जाते. ही चटणी चविष्ट आणि तिखटसर लागते. तर मग जाणून घ्या ही झणझणीत चटणी कशी बनवायची?

खसखसची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • आर्धा कप खसखस  
  • 2 हिरव्या मिरच्या  
  • 4-5 लसूण पाकळ्या  
  • 1 चमचा लिंबाचा रस  
  • चवीनुसार मीठ  
  • 3 चमचे खवलेला नारळ (आवश्यकतेनुसार)  
  • 1 चिमूटभर मोहरी  
  • कडीपत्ता  
  • थोडेसे पाणी (प्रमाणानुसार)  

खसखसची चटणी बनवण्याच्या दोन पद्धती

1. अर्धा कप खसखस रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा.

2. दुसऱ्या दिवशी पाणी काढून, खसखस मिक्सरमध्ये टाका.

3. त्यात हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या घालून बारीक वाटून घ्या.

4. वाटलेली चटणी एका भांड्यात काढा आणि त्यात चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घाला.

5. चविष्ट खसखस चटणी तयार आहे.

जर तुम्ही चटणी बनवण्यासाठी खसखस भिजवायची विसरलात तरी काही हरकत नाही, खसखस भाजूनदेखील तशीच चवदार चटणी बनवू शकता.

1. अर्धा कप खसखस कोरडी भाजून घ्या जोपर्यंत त्याचा सुगंध येत नाही.

2. भाजलेली खसखस मिक्सरमध्ये टाका.

3. त्यात खवलेला नारळ, हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या घालून बारीक वाटून घ्या.

4. चटणी एका भांड्यात काढून त्यावर मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी द्या.

5. गरमागरम भाकरी किंवा पराठ्यासोबत ही चटणी सर्व्ह करा.

हे ही वाचा: 'या' धान्यांना पंतप्रधान मोदींनी संबोधलं सुपरफुड; तुमच्या आहारात करता का यांचा समावेश?

खसखसचे आरोग्यदायी फायदे  

खसखस हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. योग्य प्रमाणात खसखसचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते. एवढेच नाही तर खसखस त्वचेसाठीसुद्धा उपयुक्त ठरते. उशिरापर्यंत झोप येत नसल्यास आहारात खसखसचा समावेश करा, यामुळे चांगली झोप लागण्यासाठी मदत करते. खसखस मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मदतरूप ठरते. याशिवाय खसखस हाडे मजबूत करण्यासाठीदेखील उपयोगी पदार्थ आहे. परंतु आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

खसखसची चटणी चवदार आणि आरोग्यवर्धक असते. एकदा नक्की करून बघा आणि वेगळ्या चवीचा आनंद घ्या!

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)