Hair Fall Remedy: सध्याच्या काळात केसगळतीची समस्या ही अगदीच सामान्य समस्या झाली आहे. फक्त महिलाच नाही तर पुरुषांमध्येसुद्धा ही समस्या वाढत आहे. शारीरिक तसेच मानसिक तणाव, पोषक तत्वांची कमतरता, होर्मोनल असंतुलन आणि प्रदूषणाच्या पर्यावरणीय कारणांमुळे केस कमजोर होतात. या समस्येला आळा घालण्यासाठी बऱ्याच उपायांचा अवलंब केला जातो. केस गळती थांबवण्यासाठी बाजारातील महागड्या प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. कित्येक लोक तर हेअरफॉल कमी करण्यासाठी डॉक्टरांचादेखील सल्ला घेतात.
असे काही घरगुती उपाय आहेत ज्यांच्या वापरामुळे केस गळती कमी होऊन केस मजबूत होण्यासाठी सुद्धा मदत होईल. हे घरगुती उपाय केमिकलविरहीत असल्यामुळे केसांवर याचा वाईट परिणामसुद्धा होणार नाहीत. जाणून घ्या, केस गळती थांबवण्यासाठी काही घरगुती उपाय.
काही सोप्या घरगुती उपायांचा अवलंब केल्याने केस निरोगी ठेवण्यास मदत होईल. आपल्या आहारात काही घरगुती ड्रिंक्सचा समावेश केल्याने केस गळतीची समस्या दूर होऊन केस मुळापासून मजबूत बनण्यास मदत होते. केसगळती थांबवण्यासाठी आहारात कोणत्या ड्रिंक्सचा समावेश करायला हवा? जाणून घ्या.
ग्रीन टीमध्ये मोठ्या प्रमाणात अॅंटीऑक्सीडेंट्स आढळतात. हे अॅंटीऑक्सीडेंट्स केसांना मुळापासून मजबूत बनवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. त्यामुळे ग्रीन टीचे सेवन हे केस गळती थांबवण्यासाठी फायद्याचे मानले जाते. सकाळच्या वेळी ग्रीन टी प्यायल्याने शरीरातील मेटाबॉलिजम वाढते. तसेच, शरीरासाठी घातक असलेल्या ऑक्सिडेटिव्ह तणावाला ग्रीन टीच्या सेवनाने कमी करता येऊ शकते.
भरपूर पोषक तत्वांनी युक्त असलेले मेथीच्या बीयांचे पाणी हे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. मेथीच्या बीयांमधील पोषक तत्वांच्या सहाय्याने केसांच्या बऱ्याच समस्या दूर होण्यास मदत होते. मेथीच्या बियांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि मिनरल्स असतात जे केसांच्या मुळांना मजबूत बनवतात. तसेच मेथीच्या बीया केसातील कोंडा कमी करण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.
नारळाचे पाणी हे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे आपल्या सर्वांनाच माहित आहे. मात्र, नारळाच्या पाणी हे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे उत्तम स्त्रोत असल्याने केसांच्या स्वास्थ्यासाठी ते अधिक फायदेशीर ठरते. नारळाच्या पाणीतील पोषक तत्वे टाळूला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळतीपासून सुटका मिळवता येते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)