'टरररर्रकन!' अलाहबादिया प्रकरणानंतर भाडीपाने अडल्ट्स ओनली शो रद्द केला, सोशल मीडियावर ट्रोल

Bhadipa Show:  भाडीपाने 14 फेब्रुवारीला होणारा हो शो रद्द केल्याचे त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन जाहीर केले. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 11, 2025, 06:30 PM IST
'टरररर्रकन!' अलाहबादिया प्रकरणानंतर भाडीपाने अडल्ट्स ओनली शो रद्द केला, सोशल मीडियावर ट्रोल title=
भाडिपा शो

Bhadipa Show: समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये केलेल्या वादग्रस्त विधानामुळे युट्यूबर रणबीर अलाहबादियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. या विधानानंतर रणबीर अलाहबादियावर चहुबाजून टिका होतेय. विनोदाला तारतम्यता असावी, युट्यूबरवर चालतं म्हणून काहीही खपवू नये अशा शब्दात समय रैनालादेखील सुनावण्यात आलंय. नुकतेच मुंबई पोलिसांनी इंडियाज गॉट लेटेंट शोचे शूटींग होते, त्या ठिकाणी भेट दिली. जनमानसातून आलेल्या संतप्त प्रतिक्रिया पाहता हे प्रकरण गंभीर वळण घेणार असं दिसतंय. दुसरीकडे भारतीय डिजिटल पार्टीने सुरु केलेल्या 'अतिशय निर्लज्ज कांदेपोहे' कार्यक्रमावरदेखील नेटकरी निशाणा साधत आहेत. या पार्श्वभूमी भाडीपने आपला आगामी  'अतिशय निर्लज्ज कांदेपोहे' हा अॅडल्ट्स ओन्ली कार्यक्रम रद्द केलाय. यावरुन नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केलीय. 'टर्रकन' असे म्हणत भाडिपनं घाबरुन हा निर्णय घेतल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

भारतीय डिजिटल पार्टी विविध सिरिज, स्टॅंडअप कॉमेडीच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोंरजन करत असतात. वेगळ्या कंटेटमुळे ते अल्पावधीतच युट्यूबवर लोकप्रिय ठरले आहेत. काही दिवसांपुर्वी भाडीपाने आपल्या चॅनलवर 'अतिशय निर्लज्ज कांदेपोहे' शो सुरु केला. हा शो समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट'पासून प्रेरित असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. भाडीपाने 14 फेब्रुवारीला होणारा हो शो रद्द केल्याचे त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन जाहीर केले. 

काय म्हणाले भाडिपा?

भाडिपाच्या फॅन्सना कळविण्यात वाईट वाटत आहे की, सध्या 'वातावरण तापल्यामुळे' 14 फेब्रुवारी रोजी होणारा अतिशय निर्लज्ज कांदेपोहे शो आम्ही पोस्टपोन करत आहोत. तसंही व्हेलेंटाइन डेला प्रेमापेक्षा जास्त द्वेशच मिळतो. पण आमतं आमच्या फॅन्सवर प्रेम आहे. आमच्या टॅलेंटला आणि प्रेक्षकांना कोणता त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतल्याचे भाडीपाने म्हटलंय. 15 दिवासांमध्ये तुम्हाला तिकिटांचा रिफंड मिळेल. यातून स्वत:साठी छान गिफ्ट घ्या. आम्हाला माहिती आहे, आमच्यावर आमच्या फॅन्सचं खूप प्रेम आहे आणि आमच्या स्टाइलची कॉमेडी तुम्हाला आवडते. म्हणूनच आमचा एक्स्क्लुझिव्ह कंटेट पाहण्यासाठी तुम्ही युट्यूब मेंबरशीप सुरु केली. आम्ही अतिशय निर्लज्ज कांदेपोहेचे सर्व व्हिडीओ 18 प्लससाठी मर्यादित केले आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबासह हा शो पाहू शकता. अतिशय निर्लज्जपणे आम्ही आमचा हा सभ शो लवकरच घेऊन येऊ. आमच्याकडून आम्ही खूप प्रयत्न केला पण तुमचा यंदाचाही व्हॅलेंटाईन डे घरी बसूनच जाणार, असंही पुढे भाडिपाने म्हटलंय. 

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

यांना शो पोस्टपोन करावा लागला यात आमचा काय दोष, उगीच ऑडियन्सवर राग काढू नका. चांगल्या कंटेंटचे आम्ही स्वागतच केले आहे. डार्क आणि घाणेरडी कॉमेडी कराल तर असंच होईल, अशी कमेंट एकाने केलीय.'बरं झाल कॅन्सल केला. आजकाल तुम्ही सुद्धा त्याच मार्गावर आहात. पुढचा नंबर तुमचा लागेल. वेळीच आवरते घ्या' अशी प्रतिक्रियाही देण्यात आलीय. 'लेकी बोले सुने लागे...., पुढचा नंबर तुमचाच होता', अशीही प्रतिक्रिया नेटकरी करत आहेत. मुळशी पॅटर्नमधील 'टर..कन' चे इमोजीदेखील पोस्टखाली कमेंटमध्ये देण्यात आलंय.