vilasrao deshmukh

उदयनराजेंपुढे काँग्रेसचा प्रस्ताव

साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांना काँग्रेसनं पक्षात येण्याची ऑफर दिलीये. केंद्रीयमंत्री विलासराव देशमुख यांनी एका खासगी कार्यक्रमात उदयनराजेंसमोर काँग्रेसप्रवेशाचा प्रस्ताव ठेवलाय.

May 25, 2012, 10:05 AM IST

पवारांनी विलासरावांना केलं टार्गेट

लातूर महानगरपालिकेचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विलासरावांना टार्गेट करत चांगलीच टीका केलीये. एकेकाळी लातूर पॅटर्नमुळे गाजणारं लातूर आता घोटाळ्यांमुळे बदनाम होऊ लागल्याची टीका करत त्यांनी विलासरावांवर नाव न घेता टीका केली आहे.

Apr 13, 2012, 04:43 PM IST

सुभाष घई, विलासराव जमीन परत करा- कोर्ट

व्हिसलिंग वूड्स फिल्म इन्स्टिट्युट जमीन प्रकरणी सुभाष घई यांची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. सरकारनं दिलेली जमीन परत घेण्याचे आदेश हायकोर्टानं दिले होते.

Apr 4, 2012, 01:38 PM IST

विलासराव - अशोक चव्हाण यांचे मनोमिलन?

माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री विलासराव देशमुखांनी आज नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. अशा प्रकारे भेट घेऊन दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांचे मनोमिलन झाले असल्याचे सांगितले जात आहे. या दोघांमधील कटुता संपल्याची चर्चा आहे.

Mar 24, 2012, 06:15 PM IST

महाराष्ट्रातून ६ जण राज्यसभेवर बिनविरोध

महाराष्ट्राच्या कोट्यातून सहा जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. यात काँग्रेसतर्फे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, राजीव शुक्ला, शिवसेनेचे सचिन अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या पुण्याच्या माजी महापौर वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी आणि भाजपच्या अजय संचेती यांचा समावेश आहे.

Mar 24, 2012, 08:38 AM IST

विलासराव देशमुख सुप्रीम कोर्टात

मुंबईत गोरेगावमधल्या जमीन प्रकरणी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते याकडे लक्ष लागले आहे.

Mar 3, 2012, 03:14 PM IST

स्टँप पेपर घोटाळाःविलासरावांना दिलासा

केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या जीवनात आजकाल कभी खुशी कभी गम असे सुरू आहे. दोन्ही मुलांचे लग्न नंतर सुभाष घई यांना जमीन दिल्याचा ठपका असे आनंद दुःखाचे क्षण येत आहेत. त्यात आता तेलगी स्टॅम्प घोटाळाप्रकरणी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांना मुंबई सेशन कोर्टाने दिलासा दिला आहे. या प्रकरणी विलासराव देशमुखांना सहआरोपी बनवण्यास कोर्टाने नकार दिला आहे.

Feb 29, 2012, 06:01 PM IST

सुभाष घईंना जमीन परत देण्याचे आदेश

राज्य सरकारनं मुक्ता आर्टला दिलेली जमीन परत करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी सुभाष घईंच्या मुक्ता आर्ट्सला १४.५ एकर जमीन दिली होती.

Feb 9, 2012, 04:45 PM IST

F1 ट्रॅकवरून आरोपांच्या गाड्या सुसाट!

दिल्लीजवळ ग्रेटर नोएडामध्ये जगातील सर्वोत्कृष्ट रेसिंग ट्रॅकपैकी तयार झालेल्या रेसिंग ट्रॅकवर यशस्वी स्पर्धा पार पडल्यानंतर आता महाराष्ट्रात या ट्रॅकवरून राष्ट्रवादीने काँग्रेसविरोधातील आरोपांची गाडी सुसाट सोडली आहे.

Oct 31, 2011, 11:21 AM IST