सरपंच ते मुख्यमंत्री पुढे केंद्रीय मंत्री
विलासराव देशमुख. बाभळगावच्या सरपंचपदापासून मुख्यमंत्रिपदापर्यंत आणि पुढे केंद्रीय मंत्रिपदापर्यंत मजल
मारणा-या विलासराव देशमुखांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला. शालीन, सुसंस्कृत आणि राजबिंडं व्यक्तीमत्व असलेल्या विलासरावांचा देशमुखी थाट नजरेत भरणारा. राजकारणात मुत्सद्दीपणाचा प्रत्यय वारंवार देणा-या देशमुखांनी श्रद्धा आणि सबुरी आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात कायम जपली.
विलासराव गेले, बाभळीची गढी ओस...
गावचे सरपंच, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा बँकेचे संचालक, राज्य मंत्रीमंडळात राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्याचे दोनदा मुख्यमंत्री आणि केंद्रात कॅबिनेट मंत्री असा विलासराव देशमुख यांचा राजकीय प्रवास करत विलासरावांनी राज्याच्या राजकारणात आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
Aug 14, 2012, 04:05 PM ISTविलासरावांच्या प्रकृतीत सुधारणा
चेन्नईच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये चार दिवसांपासून उपचार सुरू असलेल्या विलासरावांच्या प्रकृतीत सुधारणा झालीय. त्यांच्या शरीरातलं ब्ल़ड इन्फेक्शन ब-याच प्रमाणात कमी झालंय. त्यांचा ब्लड प्रेशरही नॉर्मल असल्याची माहिती हॉस्पिटलनं दिलीय.
Aug 9, 2012, 03:40 PM ISTविलासरावांची प्रकृती चिंताजनक, बाबा-दादा चेन्नईत
केंद्रीय मंत्री विलासराव देशमुखांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात ब्ल़ड इन्फेक्शन झाल्यानं शरीरातल्या अनेक अवयवांना इजा पोहचली आहे. त्यामुळं डॉक्टरांनी तूर्तास यकृत प्रत्यारोपणाचा निर्णय पुढं ढकलला आहे. विलासरावांची प्रकृती स्थिर व्हावी यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
Aug 9, 2012, 07:41 AM ISTब्लड़ इन्फेक्शन, विलासरावांच्या प्रकृतीला धोका
केंद्रीय मंत्री विलासराव देशमुखांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. त्यांच्या शरिरात मोठ्या प्रमाणात ब्ल़ड इन्फेक्शन झाल्यानं शरीरातल्या अनेक अवयवांना इजा पोहचली आहे. त्यामुळं डॉक्टरांनी तूर्तास यकृत प्रत्यारोपणाचा निर्णय पुढं ढकलला आहे. विलासरावांची प्रकृती स्थिर व्हावी यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
Aug 8, 2012, 11:18 PM ISTविलासरावांच्या दोन्ही किडन्या निकामी
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. सोमवारी त्यांना चेन्नईतील ग्लोबल रुणालयात दाखल करण्यात आले होते.
Aug 8, 2012, 08:30 PM ISTरितेश देशमुख विलासरावांना देणार किडनी?
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांची प्रकृती फारच चिंताजनक आहे. त्यामुळेच त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलं आहे.
Aug 8, 2012, 04:17 AM ISTविलासराव देशमुखांची प्रकृती चिंताजनक
केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांना चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या असून लिव्हरला सूज आली आहे. त्यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे.
Aug 7, 2012, 04:06 PM ISTकुपेकरांच्या कबुलीचा ‘आदर्श’; चूक केली कबूल
आदर्श घोटाळा उघड झाल्यामुळं आदर्शमधील फ्लॅटधारकांना आता आपल्या चूका उमजू लागल्यात. विधानसभेचे अध्यक्षपद भुषवलेले आणि आदर्शचे एक फ्लॅटधारक बाबासाहेब कुपेकरांनीही याप्रकरणी आपला कबुलनामा आदर्श चौकशी आयोगासमोर ठेवला.
Jul 26, 2012, 09:02 AM ISTआता टोलवाटोलवीचाही ‘आदर्श’?
आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणात नेत्यांची टोलवाटोलवी सुरुच आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या साक्षीत आज पुन्हा हेच समोर आलं. अशोक चव्हाणांनी या प्रकरणात विलासरावांकडे बोट दाखवले आहे.
Jun 30, 2012, 04:21 PM ISTविलासराव म्हणतात 'तो मी नव्हेच'
आदर्श घोटाळ्यात चौकशी समितीसमोर हजर झालेल्या विलासराव देशमुखांनी आज सलग दुस-या दिवशीही तो मी नव्हेच पवित्रा कायम ठेवत अशोक चव्हाणांवर जबाबदारी ढकलली.
Jun 27, 2012, 09:53 PM ISTआदर्श घोटाळा : विलासराव हाजीर हो...SSS
मुंबईतील आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांची आज पुन्हा साक्ष होणार आहे. त्यासाठी ते चौकशी आयोगासमोर हजर झाले आहेत.
Jun 27, 2012, 12:52 PM ISTविलासरावांनी फोडले अशोक चव्हाणांवर खापर!
वादग्रस्त 'आदर्श'च्या इमारतीसाठी जमीन देण्याचा आदेशाच्या फाईल्स मुख्य सचिवांनीच तपासल्या होत्या, असे सांगून राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनीही या प्रकरणी महसूल खात्याकडे बोट दाखवत मी नाही त्यातला असे दाखवून दिले आहे.
Jun 26, 2012, 07:02 PM ISTआदर्श घोटाळा : शिंदेंनंतर विलासरावांची बारी
आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री विलासराव देशमुख यांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. त्यासाठी देशमुख आज चौकशी आयोगासमोर हजर राहणार आहेत. काल सुशीलकुमार शिंदेंची साक्ष नोंदवण्यात आली. त्यांनी आपल्या साक्षीत आधीच्या मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवत संपूर्ण जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळं आता विलासराव देशमुख काय भूमिका घेतात याकडं लक्ष लागले आहे.
Jun 26, 2012, 11:12 AM ISTसुशीलकुमारांचं बोट विलासरावांकडे...
आदर्श घोटाळ्याच्या सुनावणीत नवीन ट्विस्ट आलाय. आदर्श आयोगासमोर साक्ष देताना माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी विलासराव देशमुखांकडे बोट दाखवलंय. आदर्श सोसायटीला जमीन देण्याचा निर्णय विलासराव देशमुख सरकारचा असल्याची साक्ष शिंदेंनी दिलीय.
Jun 26, 2012, 08:33 AM IST