voting

मणिपुरात हिंसाचार, ५ ठार

मणिपूर विधानसभा निवडणुकीत मतदानादरम्यान हिंसाचारात वाढ झाली आहे. या हिंसाचारात पाच जण ठार आणि अनेक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Jan 28, 2012, 03:44 PM IST

मणिपूरमध्ये ३० टक्के मतदान

मणिपूर विधानसभा निवडणुकीत इंफाळ पूर्व, इंफाळ पश्‍चिम, थोऊबल आणि बिशेनपूर या जिल्ह्यांमध्ये सकाळपासून मतदान केंद्रांपुढे उत्साही मतदारांच्या लांबच रांगा लागल्या आहेत. निवडणुकीत पहिल्या ३ तासांमध्ये तब्बल ३० टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे. साठ सदस्यांच्या विधानसभेसाठी २७९ उमेदवार रिंगणात आहेत.

Jan 28, 2012, 03:21 PM IST

उर्वरित नगरपालिकेसाठी आज मतदान

सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर नगरपालिकेच्या २६ जागांसाठी आज मतदान होत आहे. निवडणुकीत ७२ उमेदवार आपलं नशिब आजमावत आहेत. मतदानासाठी शहरात ८२ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.

Dec 13, 2011, 07:39 AM IST

चंद्रपूरमध्ये दोन नगरपालिकांमध्ये मतदान

चंद्रपूर नगरपालिकांतील दोन नगरपालिकांच्या मतदानास सुरूवात झालीय. राजुरा व मल या नगरपालिका क्षेत्रात मतदान होत आहे. परिसरात थंडी असल्यानं सकाळी संथगतीने मतदानास सुरुवात झालीय.

Dec 11, 2011, 07:47 AM IST

बार्शीत मतदानाला गर्दी

सोलापुरातल्या बार्शीत मतदानास सुरूवात झालीय. सुट्टीचा दिवस असल्यानं मतदारांनी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी गर्दी केलीय. बार्शीत अंदाचे पावणे दोन लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील अशी अपेक्षा आहे.

Dec 11, 2011, 07:42 AM IST

जुन्नरमध्ये मतदान

जुन्नर नगरपालिकेतल्या १७ जागासांठी मतदानला सुरुवात झालीय. इंथराष्ट्रवादीविरोधशिवसेना,RPI आणिभाजपअशी थेट लढतआहे. तर काही ठिकाणी मनसेची युती पाहायला मिळतेय.मतदारांचा मात्र थंड प्रतिसाद पहायला मिळतोय.

Dec 11, 2011, 07:38 AM IST

रत्नागिरीत मतदान

रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी मतदानास सुरूवात झालीय. चार नगरपालिका आणि १ नगर पंचायतीसाठी निवडणूक होत आहे.एकून १०३ नगरपालिकांच्या जागांसाठी मतदान होत असून ३८२ उमेदावार रिंगणात आहेत.

Dec 11, 2011, 07:30 AM IST

सिंधुदुर्गमध्ये मतदान

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकांसाठी मतदानास सुरुवात झालीय. जिल्ह्यातील मालवण, वेगुर्ला आणि सावंतवाडती मतदानास सुरूवात झालीय. बहुचर्चित वेंगुर्ल्यांत १७ जागांसाठी ५९ उमेदवार रिंगणात आहेत.

Dec 11, 2011, 07:01 AM IST