zee24taas

अरेरे! ऑफिसमध्ये पत्नीच्या गालावर किस केल्यानं गमावली नोकरी

युरोपमधील ब्रिस्टल इथल्या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला ऑफिसमध्ये स्वतःच्या पत्नीला चांगलंच महागात पडलंय. पत्नीला किस केल्यानं ३७ वर्षीय मार्टिन सिंग यांना कंपनीतून नारळ देण्यात आला असून कंपनीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सिंग यांनी केली आहे. 

Oct 22, 2015, 10:58 PM IST

विजयादशमीच्या दिवशी भारताचा महत्त्वपूर्ण 'विराट' विजय, सीरिजमध्ये २-२ची बरोबरी

विराट कोहलीनं आज गेल्या आठ महिन्यांमध्ये खेळलेल्या वनडेमधील सेंच्युरीची प्रतिक्षा संपवत जबरदस्त सेंच्युरी केली. त्यामुळंच भारतानं आज विजयादशमीच्या दिवशी मॅच जिंकून विजयाचं सोनं लुटलं. ३५ रन्सनं चौथी वनडे मॅच जिंकत भारतानं सीरिजमध्ये २-२ची बरोबरी केलीय.

Oct 22, 2015, 10:36 PM IST

विराट कोहलीचा नवा रेकॉर्ड, गांगुली, दिलशानचा रेकॉर्ड मोडला

चेन्नईतील दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या चौथ्या वनडे मॅचमध्ये विराट कोहलीनं १३८ रन्सची खेळी करत आपल्या क्रिकेट करिअरमधील २३वी सेंच्युरी झळकावली. तब्बल १२ मॅचनंतर विराटनं आपली २३वी सेंच्युरी साजरी केलीय. या सेंच्युरीबरोबरच विराटनं भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली, श्रीलंकेचा सलामीवीर दिलशान आणि वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल यांना मागे टाकलंय. त्यांची प्रतेकी २२ शतकं होती. 

Oct 22, 2015, 10:12 PM IST

सरकार टिकणार, भाजपशी काडीमोड नाहीच - उद्धव ठाकरेंचे संकेत

चांगला सुरु असलेला संसार तोडूनमोडून टाकण्याची विघ्नसंतोषी भूमिका शिवसेना कधीच घेणार नाही असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुर्तास सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचं स्पष्ट केलंय. 

Oct 22, 2015, 09:52 PM IST

मंदिर वही बनायेंगे, तारीख नही बतायेंगे- उद्धव ठाकरेंची घोषणा

शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मंदिर वही बनायेंगे, तारिख नही बतायेंगे असा सणसणीत टोलाही त्यांनी भाजपाला लगावला आहे. राम मंदिर बांधण्याच्या घोषणा पोकळ असल्याची टीकाही उद्धव यांनी केली.

Oct 22, 2015, 07:57 PM IST

धक्कादायक घटना, रिक्षाचालकाची महिलेला मारहाण

शहरातील रिक्षाचालकांच्या मुजोरीचे प्रकरणं नेहमीच पुढे येत असतात. अशीच एक घटना पुन्हा कल्याणमध्ये घडलीय. कारला धडक मारल्याचा जाब वितारला म्हणून एका शिक्षिकेला रिक्षाचालकानं मारहाण केल्याची घटना घडलीय. 

Oct 22, 2015, 07:29 PM IST

डाळीच्या साठेबाजांवर छापासत्र सुरूच, ठाण्यातून साडेसात कोटींचं धान्य जप्त

डाळींच्या वाढलेल्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या दिवशीदेखील सरकारचं छापासत्र सुरूच आहे. ठाणे पुरवठा विभागानं आज शीळ डायघर भागातल्या चामुंडा वेअर हाऊसवर छापा टाकून ७ कोटी ७४ लाख ५८ हजार ९६० रुपयांचं कडधान्य जप्त केलं. 

Oct 22, 2015, 06:42 PM IST

हॉस्पिटलमध्येही 'घाणेरडी नजर', चेंजिंग रूममध्ये सापडला कॅमेरा

राजीव गांधी कँसर हॉस्पिटलच्या चेंजिंग रूममध्ये कॅमेरा सापडल्यानंतर खळबळ माजलीय. एका महिला कर्मचाऱ्यानं तयार होत असतांना हे पाहिलं आणि नंतर अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Oct 22, 2015, 06:07 PM IST

'प्रेम रतन धन पायो'मध्ये सलमाननं फी विना केलं काम

दिवाळीच्या मुहूर्तावर अवघं बॉलिवूड आणि सलमानचे फॅन्स 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटाची वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार सलमाननं या चित्रपटासाठी कोणतीही फी घेतली नाहीय. 

Oct 22, 2015, 05:28 PM IST

'लंडन ठुमकदा', 'जी करदा'चा गायक लभ जांजुआचा संशयास्पद मृत्यू

'क्वीन' चित्रपटातील हिट गाणं 'लंदन ठुमकदा' गाणारा गायक लभ जंजुआच्या घरात संशयास्पद स्थितीत त्यांचा मृतदेह सापडला. बॉलिवूडच्या या हिट सिंगरचा मृतदेह त्याच्याच बेडरूममध्ये सापडला.

Oct 22, 2015, 04:37 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्क्यांनी वाढ

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या महाभाई भत्त्यात सहा टक्क्यांनी वाढ करण्यात आलीय. परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी ही घोषणा केलीय. एसटी कर्मचाऱ्यांना सध्या १०७ टक्के दरानं महागाई भत्ता दिला जातो. या निर्णयामुळं आता तो ११३ टक्के झालाय. 

Oct 22, 2015, 12:02 AM IST