सेवेसाठी ग्राहकांना मोजावे लागतील जास्त पैसे...कसा असेल प्लान...बातमी एकदा वाचाच...

5G लाँच केल्यामुळे, लाईफस्टाईल, व्यवसाय आणि  कार्यपद्धती बदलेल 

Updated: Jul 24, 2022, 03:50 PM IST
सेवेसाठी ग्राहकांना मोजावे लागतील जास्त पैसे...कसा असेल प्लान...बातमी एकदा वाचाच... title=

मुंबई:  भारतात 5G मोबाईल नेटवर्क या वर्षी सुरू होऊ शकते. Jio, Airtel आणि Vodafone Idea 5G स्पेक्ट्रम लिलावाची तयारी करत आहेत.  5Gसेवेसाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतील असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.  Airtel आणि Jio सारख्या कंपन्या सुरुवातीला 5G डेटा प्लॅनसाठी जास्त शुल्क आकारू शकतात दरम्यान,  ग्राहकांना 5G सेवेसाठी जास्त पैसे मोजावे लागतील. विश्लेषकांच्या मते, Airtel आणि Jio सारख्या कंपन्या सुरुवातीला 5G डेटा प्लॅनसाठी जास्त शुल्क आकारतील.

5G योजना खूप महाग असतील

सुरुवातीला 5G योजना 4G पेक्षा 10 ते 12 टक्के महाग असू शकतात. वाढीव किमतींमुळे दूरसंचार कंपन्यांमध्ये प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) वाढीची नवीन लाट निर्माण होईल.  एका विश्लेषकाने सांगितले की 4G पेक्षा 10x अधिक 5G स्पीडचा उद्देश मध्यम श्रेणी आणि प्रीमियम स्मार्टफोन वापरकर्त्यांना आकर्षित करणे असेल, जे जास्त किंमत मोजण्यास तयार असतील.

भारी खर्चाची तयारी करूनच ठेवा

 5G स्पेक्ट्रमचा लिलाव 26 जुलैपासून सुरू होणार आहे.  यामध्ये किमान 4.3 लाख कोटी रुपयांचे एकूण 72 GHz स्पेक्ट्रम लिलावासाठी ठेवण्यात येणार आहेत.  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने 5G स्पेक्ट्रम लिलाव सुरू होण्यापूर्वी 14,000 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम (EMD) जमा केली आहे.  अदानी समूहाने 100 कोटी रुपये जमा केले आहेत.
आगाऊ रकमेची ठेव ही कंपनी लिलावात किती स्पेक्ट्रमची बोली लावू शकते हे सांगते. म्हणजेच ग्राहकांच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Jio आक्रमकपणे बोली लावणार आहे.

काय आहे 5G सेवा  

सोप्या शब्दात, 5G हे सर्वात आधुनिक स्तराचे नेटवर्क आहे, ज्या अंतर्गत इंटरनेटचा वेग सर्वात वेगवान असेल. यात अधिक विश्वासार्हता असेल आणि पूर्वीपेक्षा जास्त नेटवर्क हाताळण्याची क्षमता असेल. याशिवाय, युझरला अनुभव देखील छानअसेल. 5G ची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते लोअर फ्रिक्वेन्सी बँडपासून ते हाय बँडपर्यंतच्या लहरींमध्ये काम करेल. म्हणजेच, त्याचे नेटवर्क अधिक विस्तृत आणि हाय स्पीड असेल.

5G स्पीड व्यतिरिक्त इतर कोणत्या सुविधा उपलब्ध असतील?

5G लाँच केल्यामुळे, लाईफस्टाईल, व्यवसाय आणि  कार्यपद्धती बदलेल असा अंदाज बांधला जातोय. खरं तर, 5G ची प्रगत तंत्रज्ञान आणि उच्च क्षमता सर्वकाही एकत्र जोडेल – घर, ड्रायव्हरलेस कार, स्मार्ट ऑफिस, स्मार्ट सिटी आणि प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता. बर्‍याच मार्गांनी, जितके चांगले आणि अशक्य बदलांचा विचार करतो, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने  ते सर्व शक्य आहे.

 

5G तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजेंस  क्षेत्रात - विशेषत: रुग्णालये, विमानतळ आणि डेटा संकलनात मोठी भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. वायरलेस तंत्रज्ञानाची पुढील पिढी केवळ फोनपुरती मर्यादित राहणार नाही. हे माञ नक्की