नवी दिल्ली : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी रिलायन्स जिओने अधिकाधिक स्वस्त प्लॅन सादर केले. नवीन वर्षापूर्वीच जिओने 3300 रूपयांच्या कॅशबॅक प्लॅन सादर केला. तसंच जिओने डाऊनलोडींग स्पीडमध्ये सातत्याने 10 महिने वोडाफोन आणि एअरटेलला मागे टाकले आहे. आता पुन्हा एकदा जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने जबरदस्त प्लॅन सादर केला आहे.
जियोच्या 98 रूपयांच्या रिचार्ज पॅकला उत्तर देण्यासाठी 93 रूपयांचा प्लॅन सादर केला आहे. यात अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग मिळेल. सोबतच रोमींगमध्ये देखील फ्री कॉलिंगच्या सुविधेच्या फायदा घेऊ शकता. इतकंच नाही तर दररोज 100 एसएमएस फ्री दिलेले आहेत. या पॅकची व्हॅलिडिटी 10 दिवसांची आहे. या दरम्यान युजर्संना 1GB 3G/4G फ्री मिळेल.
जिओच्या 98 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सोबत 2.1 GB 4G डेटा मिळेल. तसंच दररोज 0.15 GB 4G स्पीडचा डेटाचा प्रयोग करू शकता. ही लिमीट संपल्यानंतर युजर्सला 64 केबीपीएस चा स्पीड अनलिमिटेड डेटा मिळेल. या प्लॅनची 14 दिवसांची व्हॅलिडिटी आहे आणि यात 140 एसएमएस फ्री मिळतील.