नवी दिल्ली : टेलिकॉम सेक्टरमधील सर्वात मोठी कंपनी असलेल्या भारती एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान्स लॉन्च केले आहेत.
रिलायन्स जिओने टेलिकॉम सेक्टरमध्ये एन्ट्री केली आणि सर्वच टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले. यानंतर प्रत्येक कंपनी ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध प्लान्स लॉन्च करत आहेत.
एअरटेलने रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आपले दोन प्लान्स लॉन्च केले आहेत. यामध्ये १५७ रुपये आणि ४९ रुपयांच्या प्लान्सचा समावेश आहे. जाणून घेऊयात या प्लान्स संदर्भात अधिक...
१५७ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ३ जीबी २जी/३जी/४जी डेटा मिळणार आहे. या प्लानची वैधता २७ दिवस असणार आहे. या प्लाननुसार, तुम्हाला प्रति एक जीबी डेटाची किंमत ५२.३० रुपये पडणार आहे. मात्र, यामध्ये वॉईस कॉलिंगची सुविधा मिळणार नाहीये.
किंमतीनुसार या प्लानचा मुकाबला रिलायन्स जिओच्या १४९ रुपयांच्या प्लानसोबत असणार आहे. जिओच्या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड वॉईस कॉलिंग, अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. तसेच या प्लानची वैधता २८ दिवस असणार आहे.
या प्लानमध्ये ग्राहकांना १जीबी २जी/३जी/४जी डेटा मिळणार आहे. या प्लानची वैधता १ दिवस असणार आहे. यामध्येही युजर्सला वॉईस कॉलिंगची सुविधा मिळणार नाहीये.
एअरटेलने लॉन्च केलेल्या प्लान्सनुसार हे प्लान आंध्रप्रदेश, तेलंगाना, कर्नाटक आणि दिल्लीतील ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. तसेच हा प्लान काही ठराविक प्रिपेड ग्राहकांसाठीच असणार आहे.