iPhone XS स्मार्टफोनवर सूट; जाणून घ्या किंमत

खास ऑफर     

Updated: Jun 30, 2020, 07:38 PM IST
iPhone XS स्मार्टफोनवर सूट; जाणून घ्या किंमत title=

नवी दिल्ली : सध्या तरूणाईमध्ये स्मार्टफोनची प्रचंड क्रेझ आहे. जर तुम्ही  iPhone घ्यायच्या विचारात आहात. तर हिच वेळ आहे. कारण  iPhone XS Max वर बंपर सूट दिली जात आहे. ऍमेझॉनवर  iPhone XS Max या फोनवर ४० हजार रूपयांपर्यंत ऑफर देण्यात आली आहे.  iPhone XS Max या 64GB फोनची किंमत १ लाख ९ हजार ९०० रुपये आहे. पण ऍमेझॉनवर हा फोन ६९ हजार ९०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ऍमेझॉनने फोनवर तब्बल ३६ टक्के सूट दिली आहे. 

ऍमेझॉनवर  iPhone XS Max फोन तीन कलरमध्ये उपलब्ध असणार आहे. गोल्ड, सिल्वर आणि स्पेस ग्रे या रंगांमध्ये हा ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. परंतु iPhone XS Max फोनवर ही ऑफर कधीपर्यंत वैध आहे हे मात्र सांगण्यात आले नाही. 

३६ टक्के डिस्काउंटचा लाभ फोनच्या गोल्ड कलर व्हेरियंटवर दिला जात आहे. फोनचा सिल्वर कलर व्हेरियंट (64GB) सध्या वेबसाइटवर आउट ऑफ स्टॉक दिसत आहे. iPhone XS Max फोनवर ही ऑफर कधीपर्यंत वैध आहे हे मात्र सांगण्यात आले नाही. iPhone XS Max 512 GB स्टोरेजच्या फोनवर कोणत्याही प्रकारची ऑफर नाही.  ग्राहकांना हा फोन १ लाख १९ हजार ९०० रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. 

या फोनमध्ये सुपर रेटिना OLED डिस्प्ले असून 6.5 इंच आहे  फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ७ मेगापिक्सलचा ट्रूडेप्थ कॅमेरा आहे.