BMW ने भारतीय बाजारपेठेत लॉन्च केल्या दोन जबरदस्त बाईक्स

BMW Motorrad ने भारतीय बाजारपेठेत दोन नव्या बाईक्स लॉन्च केल्या आहेत. K 1600 B आणि R nineT racer अशी या बाईक्सची नावे आहेत.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 25, 2017, 11:11 PM IST
BMW ने भारतीय बाजारपेठेत लॉन्च केल्या दोन जबरदस्त बाईक्स  title=
Image Courtesy: www.bmw-motorrad.com

नवी दिल्ली : BMW Motorrad ने भारतीय बाजारपेठेत दोन नव्या बाईक्स लॉन्च केल्या आहेत. K 1600 B आणि R nineT racer अशी या बाईक्सची नावे आहेत.

गोव्यात केलं लॉन्चिंग 

कंपनीने K 1600 B आणि R nineT racer या दोन्ही बाईक्स गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या इंडिया बाईक वीक 2017 मध्ये लॉन्च केल्या आहेत.

यापूर्वी BMWच्या 11 बाईक्स

K 1600 B आणि R nineT racer या दोन्ही बाईक्स लॉन्च करण्यापूर्वी बीएमडब्ल्यू मोटर्राडच्या भारतीय बाजारपेठेत ११ बाईक्स आहेत.

बाईकचे फिचर्स

BMW K 1600 B या बाईकमध्ये 1649cc चं 6 सिलिंडर इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 160 Bhp ची पॉवर आणि 175Nm चं   टार्क जनरेट करतं. या बाईकमध्ये रिवर्स गेअरचाही समावेश करण्यात आला आहे. 

बाईकची किंमत 

BMW K 1600 B या बाईकची किंमत भारतीय बाजारात 29 लाख रुपये (एक्स शो रुम) ठेवण्यात आली आहे. तर BMW R nineT racer या बाईकची एक्स शो रुम किंमत 17.30 लाख ठेवण्यात आली आहे.