तुम्हालाही Insta Account वर ब्लू टिक हवी आहे का? फक्त करा हे सोप्पं काम

Insta Account वर ब्लू टिक मिळणं म्हणजे काय,  प्रत्येक User हे माहिती असायलाच हवे

Updated: Dec 12, 2022, 12:15 PM IST
तुम्हालाही Insta Account वर ब्लू टिक हवी आहे का? फक्त करा हे सोप्पं काम title=
Do you also want Blue Tick on your Instagram Account Just do this simple task nz

Instagram : सोशल मीडियावर (Social Media) हल्ली सगळेच सक्रिय असतात. सोशल मीडिया साइट्स वर लोकं आपल्या भावना व्यक्त करुन जवळच्या लोकांपर्यंत पोहचवत असतात. विशेषत: ज्या व्यक्तींना कॉल करणे कठीण असते त्या व्यक्तींसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून एकाच वेळेस अनेकांपर्यंत पोहचू शकतो. सध्या जोरात वापरात असलेलं इंस्टाग्राम (Instagram) लोकांचे आकर्षण राहिलेलं आहे. आज जगभरात सामान्य नागरिकांपासून ते देशी-विदेशी सेलिब्रिटींपर्यंत सगळेच इंस्टाग्रामचा वापर करतात. तुम्ही  इंस्टाग्रामवर पाहिले असेलच की सामान्य लोक सोडून काही खास लोकांच्या खात्यावर ब्लू टिक आहे, पण इंस्टाग्राम अकाउंटवर ब्लू टिक मिळवण्यासाठी एक नियम आणि प्रक्रिया आहे, ज्याद्वारे तुम्ही ब्लू टिक मिळवू शकता. आज आम्ही या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत की तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट ब्लू टिक कसे मिळवू शकता. (Do you also want Blue Tick on your Instagram Account Just do this simple task nz)

 

ब्लू टिक (Blue Tick) म्हणजे काय?

तुम्हाला इंस्टाग्रामवर अनेकांच्या अकाऊंटवर निळ्या रंगाची टिक पाहिली असेल. एखाद्या सेलिब्रिटी (Celebrity) किंवा नेत्याच्या अकाउंटवर ही ब्लू टिक तुम्ही अनेकदा पाहिली असेल. याचा अर्थ हे खाते अधिकृत verified आहे. म्हणजेच इंस्टाग्रामने त्याची तपासणी आणि चाचणी केल्यानंतरच त्यांना ब्लू टिक दिली जाते. अशाने हे  खातं अधिकृत असल्याचे दर्शविते.

ब्लू टिक मिळवण्याचा नियम आणि पद्धत काय आहे? (What is the rule and method of getting blue tick?)

स्मार्टफोन किंवा आयफोनवर Instagram ॲप डाउनलोड करा आणि लॉग इन करा आणि ते उघडा. त्यानंतर तुमचे प्रोफाइल उघडा. प्रोफाइल उघडल्यानंतर उजव्या बाजूला तीन लाईन दिसतील. येथे तुम्हाला क्लिक करावे लागेल. तुम्ही येथे क्लिक केल्यास तुम्हाला सेटिंग दिसेल. सेटिंग पर्यायावर जा. यानंतर तुम्हाला अकाउंट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. तुम्ही अकाउंटच्या पर्यायावर क्लिक केल्यास, तुम्हाला एकाच वेळी अनेक पर्याय दिसतील. खाली आल्यावर तुम्हाला रिक्वेस्ट व्हेरिफिकेशनचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करताच तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची पूर्ण नावाने ओळख द्यावी लागेल आणि विचारत असलेल्या माहितीबद्दल तुम्हाला सांगावे लागेल. काही वेळा सरकारी ओळखपत्रही अपलोड करावे लागतात. हे केल्यानंतर, काही दिवसांनी, इंस्टाग्राम अधिकृत केल्यानंतर ब्लू टिक प्रदान करते.