फेसबुक लवकरच लॉन्च करणार व्हिडिओ चॅट डिव्हाईस...

फेसबूक हार्डवेअर उत्पादनाच्या बाजारात आपले पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 11, 2018, 03:25 PM IST
फेसबुक लवकरच लॉन्च करणार व्हिडिओ चॅट डिव्हाईस... title=

सेन्ट फ्रांसिस्को : फेसबूक हार्डवेअर उत्पादनाच्या बाजारात आपले पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. मे महिन्यात होम व्हिडिओ चॅट डिव्हाईस लॉन्च करण्यात येईल.

काय आहे हे डिव्हाईस?

ज्याचे नाव पोर्टल आहे. यामुळे अॅमेझॉनच्या इको शो आणि गुगल असिस्टेंट-संचालित टचस्क्रीन्ससाठी स्पर्धा वाढेल. पोर्टल हे फेसबुकचे परिपूर्ण उत्पादन असून ते मे महिन्यात लॉन्च करण्यात येईल.रिपोर्टनुसार, या डिव्हाईसची किंमत ४९९ डॉलर्स असेल. जे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे उपलब्ध असेल.

काय आहे खासियत?

पोर्टल अॅमेझॉनच्या इको शो आणि गुगल असिस्टेंट-संचालित टचस्क्रीन्सशी स्पर्धा करेल. जे सीईएस २०१८ मध्ये सोनी, सॅमसंगच्या जेबीएल, एलजी आणि लेनोव्हो ने लॉन्च केले होते.पोर्टलमध्ये एक व्हाईड अॅंगल लेन्स असेल, ज्यामुळे लोकांचा चेहरा ओळखून फेसबुक अकाऊंटशी मिळता आहे की नाही, हे पाहण्यास सक्षम असेल.