मुंबई : देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी असलेल्या 'हीरो मोटोकॉर्प' आज ३ नव्या मोटारसायकल लॉन्च करत आहे.
Passion XPro, Passion Pro और Super Splendor चे २०१८ चे मॉडेल यामध्ये असणार आहेत.
या तीन बाईकमध्ये पेट्रोल वाचविण्यासाठी कंपनीने i3s टेक्नॉलीजी दिली आहे. याचसोबत बाईकच्या स्टाईलमध्ये बदल केला असून नवे ग्राफिक्सही दिले आहेत.
जून महिन्यात कंपनीने मोटारसायकलचे ७ मॉडेल बनविणे बंद केले. या मॉडेल्सची पाहीजे तशी विक्री झाली नाही.
हिरो पॅशन एक्सप्रोचे उत्पादन या वर्षाच्या सुरूवातीला बंद करण्यात आले होते. आता नव्या रंगात, नव्या रुपात पुन्हा सर्वांसमोर येत आहे.
'हिरो स्प्लेंडर' आणि 'पॅशन प्रो'ची बाजारातील मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामूळे यांनाही थोड्याफार बदलाने मार्केटमध्ये आणण्यात येईल.
या तिघांमध्ये हिरो पॅशन प्रोला सर्वात छोटे इंजिन ९७.२ सीसीचे इंजिन असणार आहे. 'पॅशन एक्स प्रो' मध्ये ११० सीसी आणि 'सुपर स्प्लेंडर' मध्ये १२५ सीसीचे इंजिन असणार आहे.
तीन बाईक्सची किंमत ५५ ते ६० हजाराच्या आत असणार आहे.