या गावात एकमेकांच्या अंगावर विंचू फेकून खेळली जाते होळी!

 भारतात होळी सनाशी अनेक प्रथा आहेत. भारताच्या वेगवेगळ्या राज्यात होळीशी संबंधित भिन्न श्रद्धा आहेत. आशीच एक प्रथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यात एक गावात विंचूंची होळीवर पूजा केली जाते, आणि नंतर त्यांच्याबरोबर होळी     खेळली जाते.

Updated: Apr 1, 2021, 02:22 PM IST
या गावात एकमेकांच्या अंगावर विंचू फेकून खेळली जाते होळी! title=

मुंबई : भारतातील होळी सणाला खूप महत्व आहे. म्हणजेच ह्या दिवशी एकमेकांना रंग, गुलाल लावून होळी साजरी करतात आणि विविध प्रकारच्या मिठाईचा आनंद घेतात. हा उत्सव सर्वांना आनंद देणारा आहे. रंगाने माखलेल्या इतर लोकांनापाहून कुणाचंही त्यांच्यासारखं रंग खेळण्याचं मन होतं. भारतात होळी सनाशी अनेक प्रथा आहेत. भारताच्या वेगवेगळ्या राज्यात होळीशी संबंधित भिन्न श्रद्धा आहेत. आशीच एक प्रथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यात एक गावात विंचूंची होळीवर पूजा केली जाते, आणि नंतर त्यांच्याबरोबर होळी खेळली जाते.

होय हे खरं आहे. विंचूचे नाव ऐकताच अंगावर काटा येतो, मात्र या गावातील लोक एकमेकांच्या अंगावर विंचू फेकून होळी साजरी करतात. सांथना गावातील लोकांचा असा विश्वास आहे की, या होळीच्या दिवशी हे विषारी विंचू कुणालाही दंश करत नाहीत. मात्र होळीनंतर घरात जेव्हा हेच विंचू येतात तेव्हा ते दंश मारतात आणि त्यांचे विष देखील माणसाच्या शरीरात पसरते.

होळीच्या दिवशी होळी दहनानंतर संथना गावातील सर्व लोक भाईसन देवीच्या डोंगरावर चढतात देवी आणि दगडांना पुष्पहार अर्पण केला जातो. पूजा झाल्यानंतर आजू बाजूचे दगड काढल्यानंतर, बरेच विंचू बाहेर पडतात. काही लोकांचा तर असाही विश्वास आहे. की विंचू त्यांचा आवाज ऐकून बाहेर येतात.

बाहेर पडलेले हे विंचू अगदी लहान मुलापासून ते, मोठी माणसे आपल्या हातात घेऊन फिरतात. विशेष म्हणजे होळीच्या दिवशी गावातील लोक रंग, पाण्याचा वापर न करता विंचूच एकमेकांच्या अंगावर टाकून होळी साजरी करतात.

टाईम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार, गावचे रहिवासी कृष्णा प्रताप भदोरिया सांगतात की, ब्रिटीश काळापासून विंचूची पूजा चालू आहे आणि आजपर्यंत विंचू चावल्याची घटना घडलेली नाही.
विंचू सहसा वेगवान असतात आणि विंचू या खेड्यातील लोकांना चिटकत नाहीत हे आश्चर्यकारक आहे.