दमदार Battery चा नवा स्वस्तात मस्त स्मार्टफोन लॉन्च, पाहा काय आहेत फीचर्स

New launch samertphones: भारतात आणखी एक नवा स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. चांगल्या बॅटरीबॅक पाहिजे असलेल्या व्यक्तींसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

Updated: Oct 23, 2022, 04:43 PM IST
दमदार Battery चा नवा स्वस्तात मस्त स्मार्टफोन लॉन्च, पाहा काय आहेत फीचर्स title=

Infinix New Launch : Infinix कंपनीने भारतात नवा Hot 20 Play स्मार्टफोन लॉन्च केलाय. या फोनमध्ये तुम्हाला 6000 mAh ची बॅटरी मिळणार आहे. हा स्मार्टफोन HD+ डिस्प्ले पंच-होल डिझाईनसह ऑफर केला जात आहे. तुम्ही देखील दिवाळीला नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा एक पर्याय आहे. जाणून घेऊयात काय आहेत याचे आणखी फिचर्स?

स्टोरेज व्हेरिएट

या स्मार्टफोनमध्ये मीडिया टेक हीलियो g37 चिपसेटचा वापर केला आहे. ज्यामध्ये तुम्हाला 64 जीबी आणि 128GB स्टोरेज वेरिएंट मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये मिळणारी स्टोरेज तुम्ही वाढवू देखील शकता. याणध्ये तुम्हाला मायक्रो एसडी कार्डचा वापर करता येणार आहे.

आयपीएस एलसीडी डिस्पले

या स्मार्टफोनमध्ये 6.82 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्पले ऑफर केला जात आहे. सोबत 90 हर्ट्जचा रिफ्रेश रेट मिळणार आहे. कॅमेराबाबत बोलायचं झालं तर यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमरा मिळणार असून फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे.

दमदार बॅटरी

या स्मार्टफोनमध्ये 6000mh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.  त्यासाठी 18 वॅटचा फास्ट चार्ज सपोर्ट देखील देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा चार्ज करण्याची गरज भासणार नाही.