७ हजाराहून कमी किंमतीत ४ कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च

फ्लिपकार्टवर फोन विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. 

Updated: Apr 24, 2019, 10:16 AM IST
७ हजाराहून कमी किंमतीत ४ कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च  title=

नवी दिल्ली : स्मार्टफोन कंपनी इंफिनिक्स (Infinix)ने ट्रिपल रियर कॅमेरा असलेला 'स्मार्ट3 प्लस' स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा ट्रिपल रिअर कॅमेरा असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. या फोनची किंमत ६९९९ रुपये इतकी आहे. येत्या ३० एप्रिलपासून फ्लिपकार्टवर 'स्मार्ट3 प्लस' फोन विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. इंफिनिक्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अनीष कपूर यांनी या स्वस्त फोनमध्ये कॅमेरासह ३५००mAh बॅटरी, हेलिओ ए२२ प्रोसेसर, २ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज दिले असल्याचे सांगितले आहे.

कंपनीने रियर २ मेगापिक्सल आणि १३ मेगापिक्सल कॅमेरासह कमी उजेडासाठी वेगळा तीसरा कॅमेरा देण्यात आला आहे. ८ मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेराही देण्यात आला आहे. अशाप्रकारे फोनमध्ये चार कॅमेरा देण्यात आले आहेत. ६.२१ इंची डिस्प्ले असलेल्या या स्मार्टफोनमध्ये अॅन्ड्रॉइड ९.० ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. फोनला फिंगरप्रिंटची सुविधाही देण्यात आली आहे. कनेटिवविटीसाठी ब्लूटूथ, ३.५ mm ऑडिओ जॅक, एफएम रेडिओ, मायक्रो यूएसबी पोर्ट यांसारखे ऑप्शनही देण्यात आले आहेत. 

अनीष कपूर यांनी कंपनी येत्या महिन्यात आणखी एक स्मार्टफोन बाजारात आणणार असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या कंपनीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत आपल्या स्मार्टफोनला घरगुती स्तरावर तयार करण्यात येणार आहे. या फोनची मेमरी मायक्रो एसडी कार्डद्वारे २५६ जीबीपर्यंत वाढवली जाऊ शकते.