मुंबई : आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसच्या प्री ऑर्डर बुकिंगला १७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. उत्तर आणि पूर्व भारतामध्ये या प्री बुकिंगला सुरुवात होईल. तर २९ सप्टेंबरपासून आयफोनची नवी मॉडेल बाजारामध्ये येतील. आयफोन X हा प्रीमियम फोन भारतात ३ नोव्हेंबर २०१७ मध्ये भारतात विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल.
मंगळवारी अॅपलनं आयफोन X, आयफोन 8, आयफोन 8 प्लस, अॅपल वॉच सीरिज 3 आणि अॅपल टीव्ही 4K लॉन्च केला. आयफोन X ची किंमत 89 हजार रुपयांपासून सुरु होणार आहे. आयफोन X ची २७ ऑक्टोबरपासून ब्राईटस्टारवर प्री बूकिंगला सुरुवात होईल. ३ नोव्हेंबरपासून हा फोन बाजारत विक्रीसाठी उपलब्ध होईल.
आयफोन X अनलॉक करण्यासाठी फेस आयडी देण्यात आला आहे. फेशियल रेकग्निशन सिस्टीम म्हणजेच चेहरा स्कॅन केल्यावर हा फोन अनलॉक होईल.
आयफोन 8 64जीबीची किंमत 64 हजार रुपये, 256जीबीची किंमत 77 हजार रुपये असेल. तर आयफोन 8 प्लस 64जीबीची किंमत 73 हजार रुपये आणि 256जीबीची किंमत 86 हजार रुपये असणार आहे. भारतात अॅप्पल आयफोन X (64GB) ची किंमत 89,000 रुपये असेल तर अॅप्पल आयफोन X (256GB) ची किंमत 1,02,000 रुपये राहील.