मुंबई : स्मार्टफोन जसजसा जुना होतो तसतसा त्याचा बॅटरी बॅकअप कमी होत जातो. अशा वेळी फोन पुन्हा पुन्हा चार्ज करावा लागतो, ज्यामुळे युजर्स कंटाळतात. मात्र, तुम्हाला हे माहित आहे का? की तुम्ही स्मार्टफोनची काही सेटिंग्ज बदलून बॅटरी बॅकअप वाढवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 पद्धतींबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करुन तुम्ही तुमच्या फोनचं आयुष्य वाढू शकतं.
1. फोनचे व्हायब्रेशन बंद करा: कॉल येईपासून ते फोनमध्ये टायपिंग करण्यापर्यंत बरेच लोक व्हायब्रेशन चालू ठेवतात. परंतु यासाठी तुमच्या फोनची भरपूर बॅटरी खर्च होते. ते बंद ठेवल्याने तुमच्या बॅटरीचे आयुष्य वाढेल तसेच ती एकदा चार्ज केल्यानंतर दीर्घ काळ चालेल.
2. अशा प्रकारचा वॉलपेपर लावा: तुम्हाला हे जाणून आश्च
र्य वाटेल की, फोनमध्ये काळा वॉलपेपर लावून बॅटरी वाचवता येते. वास्तविक, वॉलपेपरमध्ये जितके अधिक रंग असतील तितकी ते दाखवण्यासाठी स्मार्टफोनची बॅटरी जास्त खर्च होईल. तसेच तुम्ही डार्क मोड देखील सक्षम केल्यास बॅटरी चांगली टिकेल.
3. ही वैशिष्ट्ये बंद ठेवा: अनेकदा लोकांच्या फोनमध्ये ब्लूटूथ, जीपीएस आणि वायफाय सारख्या सेटिंग्ज नेहमी चालू असतात. हे सर्व सतत बॅटरी वापरतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही त्यांचा वापर करत नसाल तेव्हा त्यांना बंद ठेवा.
4. ऑटो सिंक बंद ठेवा: Gmail पासून Twitter आणि Photos पर्यंत, Photos सारखी ऍप्स डेटा सतत रिफ्रेश करत राहतात. यामुळे फोनची बॅटरी आणि मोबाईल डेटा दोन्ही खर्च होतो. फोनच्या सेटिंग्जवर जा, गुगल अकाउंटवर जा आणि ऑटो सिंक फीचर बंद करा.
5. ब्राइटनेस कमी ठेवा: फोनचा ब्राइटनेस कमी ठेवल्याने बॅटरीची बचत होते. फोनची ब्राइटनेस खूप जास्त असल्यास फोनच्या बॅटरीचा वापर वाढतो. विशेष बाब म्हणजे आता बहुतेक फोन्समध्ये डार्क मोड आला आहे, ज्यामुळे बॅटरी वाचण्यास खूप मदत होते.