INNOVA आणि Ertiga ला विसरुन जाल! सर्वांची झोप उडवतीये 'ही' 7 सीटर फॅमिली कार, स्वस्त आणि अॅडव्हान्स फिचर्सनी सज्ज

Kia Carens: Kia ने 15 फेब्रुवारी 2022 रोजी आपली 7-सीटर कार मार्केटमध्ये लाँच केली होती. कंपनीने या कारसह Maruti Ertiga आणि Toyota Innova ला स्पर्धा दिली होती. याचं कारण या सेगमेंटमध्ये या दोन कारव्यतिरिक्त दुसरी कोणती कार उपलब्ध नाही.   

शिवराज यादव | Updated: May 17, 2023, 06:49 PM IST
INNOVA आणि Ertiga ला विसरुन जाल! सर्वांची झोप उडवतीये 'ही' 7 सीटर फॅमिली कार, स्वस्त आणि अॅडव्हान्स फिचर्सनी सज्ज  title=

Kia Carens: भारतीय ग्राहक गाडी खरेदी करताना त्यामध्ये किती स्पेस आहे याकडे आवर्जून लक्ष देतात. आजही एकत्र कुटुंबपद्दती असल्याने छोट्या गाड्यांसह जास्त आसन मर्यादा असणाऱ्या वाहनांनाही तितकीच पसंती दिली जाते. याचं कारण मोठी गाडी असल्यास संपूर्ण कुटुंब किंवा मित्रांचा गोतावळा एकत्र प्रवास करु शकतो. खासकरुन गावी किंवा लांबच्या प्रवासाला जाताना अशा गाड्यांचा फार फायदा होतो. या MPV सेगमेंटमध्ये गेल्या अनेक काळापासून Maruti Ertiga आणि Toyota Innova चा दबदबा आहे. पण मार्केटमध्ये नव्याने लाँच झालेल्या कारने या दोन्ही गाड्यांना तगडं आव्हान उभं केलं आहे.
 
Kia Carens आपल्या आकर्षक लूकसह दमदार इंजिन आणि अॅडव्हान फिचरसाठी ओळखली जाते. एप्रिल महिन्यात विक्रीच्या बाबतीत या कारने Maruti Ertiga आणि Toyota Innova या दोघांनाही मागे टाकलं आहे. Kia Carens ने अशी कामगिरी करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी फेब्रुवारी महिन्यात Kia Carens च्या विक्रीची आकडेवारी Maruti Ertiga च्या जवळ पोहोचली होती. 

गेल्या एप्रिल महिन्यात Kia Carens च्या एकूण 6107 युनिट्सची विक्री झाली आहे. गेल्या महिन्यात हा आकडा 5754 इतका होता. दुसरीकडे याच महिन्यात Maruti Ertiga च्या 5532 युनिट्सची विक्री झाली आहे. मात्र गतवर्षी एप्रिल महिन्यात हाच आकडा तब्बल 14,889 इतका होता. दरम्यान या सेगमेंटमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या Toyota Innova च्या 4837 युनिट्सची विक्री झाली आहे. 

सेल्स रिपोर्टनुसार, Maruti Ertiga च्या विक्रीत वेगाने घसरण झाली आहे.  Ertiga च्या विक्रीची आकडेवारी पाहिली तर प्रत्येक वर्षीच्या आकडेवारीनुसार महिन्याला 63 टक्के घसरण दिसत आहे. दुसरीकडे Kia Carens च्या विक्रीत जास्त नाही पण 6 टक्के वाढ झाली आहे. 

Kia India ने अत्यंत योजनापूर्वक ही Carens ला बाजारात आणलं होतं. 15 फेब्रुवारी 2022 ला कंपनीने फक्त 8 लाख 99 हजारांच्या सुरुवातीच्या किंमतीत ही कार लाँच केली होती. दोन वेगवेगळ्या सीटिंग कॉन्फिगरेशन आणि एमपीव्ही स्टाइलनेमध्ये एसयुव्हीचा फील देणाऱ्या या कारने तिला इतरांपेक्षा वेगळं केलं होतं. महत्त्वाचं म्हणजे, कंपनीने Maruti Ertiga आणि Toyota Innova यांच्यातील त्या प्राइस गॅपला टार्गेट केलं होतं, जिथे अन्य कोणतीही कार उपलब्ध नाही. 

Kia Carens ची किंमत Innova च्या तुलनेत कमी, मात्र स्पेस Ertiga पेक्षा जास्त देण्यात आला आहे. कारचा व्हीलबेसही Innova पेक्षा जास्त आहे. याशिवाय कंपनीने यामध्ये अनेक अॅडव्हान फिचर्स दिले आहेत. कंपनीचं म्हणणं आहे की, या कारला अशाप्रकारे डिझाइन करण्यात आलं आहे की एमपीव्ही स्टाइलमध्ये एका एसयुव्ही चाहत्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यात आल्या आहेत. 

Kia Carens एकूण पाच व्हेरियंटमध्ये उपलब्ध असून लाँड झाल्यानंतर तिची किंमत वाढली आहे. ही कार आता 10.45 लाख ते 18.95 लाखात उपलब्ध आहे. 

दोन पेट्रोल इंजिन आणि एक डिझेल इंजिन असलेल्या या कारमध्ये 1.5 लिटर पेट्रोल (115PS पॉवर आणि 144Nm टॉर्क), 1.4 लिटर टर्बो-पेट्रोल (140PS पॉवर आणि 242Nm चा टॉर्क) आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन देण्यात आलें आहे. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल, 7-स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन (DCT) ऑटोमॅटिकशी जोडलेले आहे. या कारमध्ये 216 लीटरचा बूट स्पेस मिळतो.

Innova, Ertiga आणि Carens च्या किंमतीत किती फरक?

Maruti Ertiga 8.64 लाख ते 13.08 लाखात उपलब्ध आहे. तर Kia Carens साठी 10.45 लाख ते 18.95 लाख मोजावे लागतात. Toyota Innova ची किंमत 19.99 लाख ते 25.43 लाख इतकी आहे.