नवी दिल्ली : मारुती सुझुकी इंडियानं आपली प्रसिद्ध एसयूव्ही कार विटारा ब्रीझाचं ऑटोमॅटिक गिअर शिफ्ट (AGS) वर्जन लॉन्च केलंय. विटारा ब्रीझाच्या नव्या वर्जनसाठी कारच्या लूकमध्येही बदल करण्यात आलाय. कंपनीनं कारच्या एक्सटीरिअर आणि इंटीरिअरमध्ये अनेक बदल केलेत. कारच्या नव्या अलॉय व्हिलमध्ये ग्लॉसी ब्लॅक फिनिश दिलं गेलंय. फ्रंट क्रोम ग्रिल आणि बॅट डोअर क्रोम गार्निश कारला खूपच सुंदर लूक देतंय.
कंपनीकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या इंटीरिअर पूर्णत: काळा रंग देण्यात आलाय. दिल्लीत ब्रीझाची एक्स शोरुम किंमत 8.54 पासून 10.49 लाख रुपयांपर्यंत निर्धारित करण्यात आलीय. मारुतीनं केलेल्या दाव्यानुसार एजीएस वेरिएन्टशिवाय ब्रीझाचा मॅन्युअल ट्रान्समिशन वेरिएन्टची विक्रीही सुरू राहील. ब्रीझाच्या नव्या व्हेरिएन्टमध्ये अगोदरच्या तुलनेत सेफ्टी फिचर्स वाढवण्यात आलेत.
मारुती इंडियाचे सीनिअर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर (मार्केटिंग एन्ड सेल्स) आरएस कल्सी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांकडून फिडबॅक घेतल्यानंतर ब्रीझाला आणखी आकर्षक रुप देण्याचा निर्णय कंपनीनं घेतला. नव्या मॉडलमध्ये हायस्पीड वॉर्निंग अलर्ट, दोन एअर बॅग, एबीएससोबत ईबीडी, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि फ्रंट सीट बेल्ट प्री-टेन्शनर्ससारख्या वेगवेगळ्या सुविधाही उपलब्ध आहेत.
व्हीडीआय AGS 8.54 लाख रुपये
झेडडीआय AGS 9.31 लाख रुपये
ZDi+AGS 10.27 लाख रुपये
ZDi+DUAL TONE AGS 10.49 लाख रुपये