नवी दिल्ली : नोकिया 3310 हा लोकप्रिय फोन पुन्हा लॉन्च झाल्याने गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. याची अजून एक खास गोष्ट म्हणजे एचएमडी ग्लोबल नोकिया 3310 चे 4G व्हर्जन लॉन्च करणार आहेत. चायनीज सर्टीफिकेशन वेबसाईट TENAA च्या नुसार कंपनी नोकिया 3310 चे 4G व्हर्जन याच वर्षी लॉन्च करतील. मात्र यासंदर्भात एचएमडी ग्लोबलने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, फोनला TENAA सर्टिफिकेशनचे मॉडल नंबर TA-1077 मिळाले आहे. नोकियाचा हा लोकप्रिय फोन वेरिएंट युन ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. हे युन अॅनरॉईडचे कस्टमाइज व्हर्जन आहे. यापूर्वी 2G कनेक्टिविटी सोबत 3310 मोबाईल फोनला गेल्या काही वर्षात मोबाईल वर्ल्डने सादर केला होता. त्यानंतर सप्टेंबरमध्ये याचे 3G वेरियंट लॉन्च केले होते.
मीडिया रिपोर्टनुसार, नोकिया 3310 च्या 4G वेरियंट फोनमध्ये काही फिचर्स पहिल्यापासूनच आहेत. यात 2.4 इंचाचा QVGA डिस्पले आणि 2 मेगापिक्सलचे LED फ्लॅश रियर कॅमेरा असेल. ड्युल सिम सपोर्ट करणाऱ्या फोनमध्ये ब्लूटूथ, एफएम रेडिओ, मायक्रो SD कार्डचे स्लॉट असेल. त्याचबरोबर यात 1200 mAh ची बॅटरी असेल.
यापूर्वी एचएमडीच्या नोकिया 3310 च्या 2G वेरिएंट नोकिया सिरीजच्या 30+ ओएस दिले आहे. याच्या 2G वेरिएंट जावा आधारित फिचर ओएस होते. कंपनीने मोबाईल वर्ल्ड 2018 (MWC 2018) मध्ये नोकिया 6 के सोबत हा फोन सादर केला जाईल. नोकिया 2 अॅनरॉईड ओरियो 8.1 अपडेट होईल, असे कंपनीने जाहीर केले आहे. मोबाईल फोनच्या जगात नोकियाचे खास स्थान आहे. 2G आणि फिचर फोन म्हणजे नोकिया अशी ओळख निर्माण करण्यास नोकिया यशस्वी झाली आहे.