मुंबई : ट्वीटर, फेसबुक आणि स्नॅपचॅट सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून लॉगआउट करणे खूप सोपे आहे. म्हणजेच, जर आपल्याला काही वेळ ते अॅप्स वापरायचे नसेल तर, आपण या अॅप्सवरून कोणत्याही अडचणीशिवाय लॉग आउट करू शकतो. पण व्हॉट्सअॅपपासून तुम्ही सहजासहजी आपली पाठ सोडवू शकत नाही. कारण तुम्हाला व्हॉट्सअॅप नोटिफिकेशन्सपासून सुटका मिळूच शकत नाही. तुम्ही ते लॅाग आऊट देखील करु शकत नाही. म्हणजेच, जर तुम्हाला व्हॉट्सअॅपपासून लांब राहायचे असेल तर, तो अॅप मोबाईलमधून अनइंस्टॅाल करावा लागेल.
आपण जरी निळी टिक ऑफ ठेवली असेल, तरी ही तुम्ही जर व्हॉट्सअॅपवर ऑनलाईन आलात तर ते समोरील व्यक्तिला समजतेच. त्यामुळे व्हॉट्सअॅपपासून आपली पाठ सोडण्याचा कोणताच उपाय नाही. यासाठी काही युकत्या आमच्याकडे आहेत, त्या जाणून घ्या.
व्हॉट्सअॅपवरून गायब होण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे फायरवॉल अॅपला इंस्टॅाल करणे. हा अॅप Mobiwol किंवा NoRoot फायरवॉल असू शकते. या अॅप्सच्या मदतीने आपण कोणत्याही एका अॅपसाठी आपले इंटरनेट कनेक्शन बंद करू शकता. तुम्ही त्यामध्ये व्हॉट्सअॅपसाठी इंटरनेट बंद ठेवलात तर तुम्हाला ईमेल मिळतील किंवा गुगल चालेल पण व्हॉट्सअॅपवर तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार नाहीत. हे अॅप्स वापरण्यासाठी आपल्याला आपला फोन रूट करण्याची आवश्यकता नाही. परंतु ते करण्यासाठी सांगत नाही कारण ते आपल्या फोनच्या प्रायवेसीसाठी धोकादायक ठरू शकते.
येथे आपल्याला तीन ऑप्शन मिळतील ज्याद्वारे आपण पूर्णपणे गायब तर नाही होऊ शकत, परंतु आपण बर्याच काळासाठी लोकांच्या नोटिफिकेशनकडे दुर्लक्ष करू शकता.
1. व्हॉट्सअॅपमध्ये असा कोणताही पर्याय नाही, ज्याच्या मदतीने तुम्ही रिंगटोन बंद करू शकता. म्हणजेच आपल्याला कोणती ना कोणती रिंगटोन निवडावीच लागेल. परंतु यामध्ये सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपण पिन ड्रॉप शांतता असलेली रिंगटोन रेकॅार्ड किंवा डाऊनलोड करु शकता आणि नंतर व्हॉट्सअॅपच्या रिंगटोन ऐवजी ती सेट करू शकता.
2. नोटिफिकेशनला व्हॉट्सअॅप आयकॉन किंवा डॉट्समध्ये रुपांतरित करु शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड फोनच्या सेटींग्ज, अॅप्स, अॅप्सची यादी, व्हॉट्सअॅप, नोटिफिकेशनवर टॅप करा आणि सर्व नोटिफिकेशन बंद होतील. त्यानंतर, तुम्हाला फोनवर नोटिफिकेशन आली आहे की, नाही? हे समजणार नाही.
3. नोटिफिकेशन लाइट बंद करा. त्यासाठी व्हॉट्सअॅप वर जा आणि नंतर सेटिंग्ज, लाइटवर जा आणि नंतर None निवडा. यानंतर, होम स्क्रीनवरून व्हॉट्सअॅप शॉर्टकट काढा. यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅपचा मेसेज येईल, पण तो कोणी पाठवला हे कळणार नाही. आपल्याला त्याचा त्रास होणार नाही.