नवी दिल्ली : शाओमीने दोन नवे स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत. शाओमीने हे स्मार्टफोन रेडमी नोट ९ सीरीजअंतर्गत लॉन्च केले आहेत. कंपनीने बहुचर्चित Redmi Note 9 pro स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. Redmi Note 9 Pro सह Redmi Note 9 Pro Max हा फोनही लॉन्च करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या स्मार्टफोनची चर्चा होती. Redmi Note 9 सीरीजमध्ये रियर क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
कंपनीने Redmi Note 9 Pro दोन प्रकारात बाजारात लॉन्च केला आहे. ४ जीबी रॅम, ६४ जीबी मेमरी आणि दुसरा ६ जीबी रॅम, १२८ जीबी मेमरी असणारे हे दोन फोन आहेत. ४ जीबी रॅम असणाऱ्या फोनची किंमत १२,९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम असणाऱ्या फोनची किंमत १५,९९९ रुपये इतकी आहे.
- ६.६७ इंची डिस्प्ले
- फ्रन्ट-बॅक दोन्ही बाजूला गोरिला ग्लास ५ प्रोटेक्शन
- Qualcomm SM7125 Snapdragon 720G प्रोसेसर
- चार कॅमेरा रियर सेटअप
- पहिला कॅमेरा ४८ मेगापिक्सल, दुसरा कॅमेरा ८ मेगापिक्सल आणि तिसरा-चौथा कॅमेरा २-२ मेगापिक्सल देण्यात आला आहे.
- सेल्फी १६ मेगापिक्सल वाईट कॅमेरा
- 5020 mAh बॅटरी
The #RedmiNote legacy continues! Introducing #RedmiNote9ProMax & #RedmiNote9Pro
Qualcomm Snapdragon 720G
️ 5020mAh battery
AI Quad Cameras
Triple #CorningGorillaGlasss 5and much more! Grabs yours in the 1st sale on 17th Mar via https://t.co/cwYEXdVQIo & @amazonIN pic.twitter.com/rhjlPobONP
— Redmi India (@RedmiIndia) March 12, 2020
'रेडमी नोट ९ प्रो' Aurora Blue, Glacier White, Interstellar Black या तीन रंगात उपलब्ध आहे.