मुंबई: रिलायन्स जिओ कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत नवीन प्लॅन आणत असते. वोडाफोन आणि एअरटेलसोबतच्या स्पर्धेत जिओने डेटाची गरज ओळखून ग्राहकांना स्वस्तात मस्त ऑफर दिली आहे. 1 ते 3 GB पर्यंत वेगवेगऴ्या योजना जिओने आपल्या ग्राहकांसाठी आणल्या आहेत. आता जिओने वाउचर प्लॅन आणला आहे. ज्याची व्हॅलिडिटी ही तुमचा प्लॅन संपेपर्यंत असणार आहे.
रिलायन्स जिओने काही डेटा वाउचर्स आणले आहेत. ज्यामध्ये तुमच्या पॅकमध्ये असलेला डेटा संपल्यानंतर तुम्हाला हे वाउचर खरेदा करता येणार आहे. हा प्लॅन अॅक्टिवेट करता येणार आहे.
रिलायन्स जिओ 11 रुपयांमध्ये 1 जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनची वैधता तुमच्या मोबाईलचा पॅक संपेपर्यंत असणार आहे. उदा. तुम्ही 199 चा रिचार्ड केला असेल. तुमचा डेटा पॅक संपला तर तुम्ही 1 GB डेटा 11 रुपये वाउचर देऊन घेऊ शकता. त्याची वैधता 199 चा प्लॅन संपेपर्यंत असणार आहे.
जिओने 11, 21, 51 आणि 101 रुपयांचे वाउचर प्लॅन आणले आहेत. 21 रुपयांत 2 GB डेटा, 51 रुपयात 6 GB तर 101 रुपयांत 12 GB डेटा मिळणार आहे.
पैसे न देता 5 वेळा रिचार्ज करता येणार
रिलायन्स जिओने आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी एक उत्तम योजना सुरू केली आहे. याअंतर्गत आता ग्राहक 5 वेळा 'पैसे न देता' रिचार्ज करता येणे शक्य आहे. ही Emergency Data Loan सेवा असेल जी, दररोजची डेटा मर्यादा संपल्यानंतर वापरकर्ते वापरू शकतात आणि कोणत्याही व्यत्ययाशिवाय हाय-स्पीड डेटा वापरु शकतील.
कंपनीच्या म्हणण्यानुसार ही, सेवा खास त्या लोकांसाठी आहे. ज्यांना दररोज मिळणारा 4 जी इंटरनेट डेटा कमी पडतो. असे ग्राहक आता त्यांचा दैनंदिन डेटा संपल्यानंतर या रीचार्जचा वापर करु शकतील. Emergency Data Loan सुविधे अंतर्गत त्यांना 'Recharge Now and Pay Later' सुविधा उपलब्ध आहे.
ही सुविधा प्रीपेड वापरकर्त्यांना प्रत्येकी 1 जीबीच्या 5 Emergency Data Loan पॅक ची किंमत 11 रुपये आहे आणि ते उधार घेण्याची परवानगी कंपनी ग्राहकांना देते.