Smartphone Charger Color Facts: ज्या कंपन्यांचे स्मार्टफोन (smartphone) भारतात आहेत त्यांचे चार्जर वेगवेगळ्या आकाराचे, वजनाचे किंवा क्षमतेचे असू शकतात. मात्र त्यामध्ये एक गोष्ट साम्य आहे ते म्हणजे चार्जचा (mobile charger) रंग.. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? या मोबाईल चार्जरचा (mobile) रंग पांढरा किंवा काळाचं का असतो? जर तुम्हाला असे वाटत असेल की यामागे कोणतेही कारण नाही, तर तुम्ही चुकीचे आहात...जाणून घ्या या मागच नेमकं कोणते कारण आहे? (smartphone mobiles companies only make white and black chargers )
पूर्वीचे चार्जर काळ्या रंगाचे होते
तुम्ही पाहिले असेल की काही वर्षांपूर्वी स्मार्टफोनच्या (smartphone charger) चार्जरचा रंग फक्त काळा होता. असे करण्यामागील कारण म्हणजे काळा रंग (black colour) हा उष्णतेला खेचून घेण्याच काम करत असतो. कंपनी कोणतीही असो, त्याच्या चार्जरचा रंग तोच राहिला. यामुळे चार्जर बराच काळ टिकले आणि त्यात कोणत्याही प्रकारची अडचण येत नाहीय.
वाचा : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी..., जाणून घ्या आजचे दर
आता चार्जर पांढऱ्या रंगाचे आहेत
आता भारतातील स्मार्टफोन (smartphone charger) चार्जरचे रंग पांढरा ठेवण्यात आला आहे. कारण पांढरा रंग (white colour) उष्णता कमी करण्यासाठी मदत करत असतो. तसेच रात्रीच्या वेळी देखील काळोखात सहज नजरेत दिसून येतो. त्यामुळे स्मार्टफोन बनवणाऱ्या बहुतेक कंपन्या आगामी स्मार्टफोनसोबत चार्जरचा रंग देखील पांढरा ठेवतात. रंगीबेरंगी न ठेवण्यामागे हेच एक कारण आहे. अनेकांना असे वाटायचे की पैसे वाचवण्यासाठी कंपन्या असे करतात, पण प्रत्यक्षात कारण काही वेगळेच आहे.