Truecaller वर कॉल रेकॉर्ड होणार

'ट्रू कॉलर' त्यांच्या युजर्ससाठी कॉल रेकॉर्डची नवी सुविधा सुरु केलेय. 

Updated: Jul 13, 2018, 08:23 PM IST
Truecaller वर कॉल रेकॉर्ड होणार title=

मुंबई : स्मार्ट फोन युजरसाठी एक चांगली बातमी आहे. 'ट्रू कॉलर' त्यांच्या युजर्ससाठी कॉल रेकॉर्डची नवी सुविधा सुरु केलेय. त्यामुळे तुम्ही आता कोणताही कॉल रेकॉर्ड करु शकता. याआधी कोणी फोन केलाय याची माहिती 'ट्रू कॉलर'च्या माध्यमातून मिळत होती. आता त्यापुढे जाईन हे नवीन फीचर्स आणले आहे.

'ट्रू कॉलर'च्या मदतीने युजर्स कोणताही कॉल रेकॉर्ड करु शकणार आहे. कंपनीने त्यांच्या संकेतस्थळावर या नवीन फीचरची माहिती दिलेय. ट्रू कॉलरच्या नव्या फिचरमुळं रेकॉर्ड केलेले कॉल डिव्हाइसमध्ये सेव्ह होणार आहेत. तर पहिल्या १४ दिवसांसाठी ग्राहकांना हे फीचर्स मोफत वापरता येईल. त्यानंतर मात्र या फीचर्ससाठी पैसे द्यावे लागणार आहेत.

दरम्यान, युजर्सच्या खासगीपणाचा मुद्दा लक्षात घेऊन कंपनीकडून कॉल रीड केला जाणार नाही किंवा कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही. युजर्सने रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार आहेत. ट्रू कॉलरचं हे नवीन फिचर फक्त अँड्रॉइड ५.० आणि त्याच्या पुढील व्हर्जनमध्येच चालणार आहे. दरम्यान, अँड्रॉइड ७.१.१ नुगावर हे फिचर सुरु होणार नाही.