उबरच्या ५.७ कोटी युजर्सची माहिती हॅकर्सने केली चोरी, यामध्ये तुम्ही तर नाही ना?

अॅपच्या माध्यमातून टॅक्सी सेवा देणाऱ्या उबर (uber) कंपनीने बुधवारी एक मोठा खुलासा केला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 22, 2017, 01:56 PM IST
उबरच्या ५.७ कोटी युजर्सची माहिती हॅकर्सने केली चोरी, यामध्ये तुम्ही तर नाही ना?  title=

नवी दिल्ली : अॅपच्या माध्यमातून टॅक्सी सेवा देणाऱ्या उबर (uber) कंपनीने बुधवारी एक मोठा खुलासा केला आहे.

उबरने केला मोठा खुलासा

उबर कंपनीने सांगितले की, हॅकर्सने त्यांच्या ५ कोटी ७० लाख ड्रायव्हर्स आणि रायडर्सची माहिती चोरी केली आहे. उबरने दिलेल्या या माहितीनंतर नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरणं निर्माण झालं आहे.

वर्षभरापूर्वीचं प्रकरण

माहिती चोरी झाल्याचं हे प्रकरण जवळपास एक वर्षापूर्वीचं आहे. मात्र, कंपनीने या बाबतची माहिती बुधवारी दिली.

उबरने हॅकर्सला दिली होती ऑफर

इतकचं नाही तर, चोरी केलेली माहिती डीलीट करण्याच्या बदल्यात उबरने हॅकर्सला एक लाख डॉलर (जवळपास ६५ लाख रुपये) दिले होते.

सीईओं म्हणतात...

दुसरीकडे उबरचे सीईओ दारा खोस्रोवशाही यांनी सांगितले की, हे खूपच चुकीचं घडलं आहे आणि याबाबत मी कुठलंही स्पष्टीकरण देणार नाहीये. खोस्रोवशाही यांनी ऑगस्ट २०१७मध्ये उबरचं काम पाहण्यास सुरुवात केली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, उबरचे को-फाऊंडर राहीलेले ट्रेविस कॅलानिक यांना डेटा चोरी झाल्याची माहिती होती. मात्र, खोस्रोवशाही यांना पदभार सांभाळेपर्यंत कुठलीही माहिती उघड न करण्याचं त्यांना सांगण्यात आलं होतं. खोस्रोवशाही यांनी सांगितले की, दोन सदस्यांच्या इन्फॉर्मेशन सिक्युरीटी टीमने डेटा चोरी झाल्यासंदर्भात कुठलाही अलर्ट दिला नव्हता.

ही माहिती झाली चोरी

जो डेटा चोरी झाला आहे त्यामध्ये युजर्सचे नाव, ईमेल आयडी, उबरमध्ये बसणारे रायडर्सचे मोबाईल नंबर, ड्रायव्हर्सचे नाव आणि लायसन्स याचा समावेश असल्याची माहिती उबरने दिली आहे.