मुंबई : स्मार्टफोन विकत घेताना आपण अनेकदा सेटिंग ऑन ठेवतो.
अनेक फीचर्सचा आपण वापर करतो. परंतू फोन सुरू करताना पहिल्यांदा वापरले जाणारे 'पॉवर' बटण अनेकदा दुर्लक्षित राहते. 'पॉवर' बटणदेखील खूप गरजेचे असते. ते अनेकप्रकारे मदत करते. या बटणाचा वापर करून फोन घेता येतो तसेच कटदेखील करता येतो. याकरिता कोणतेही अॅप किंवा सेटिंगमध्ये बदल करण्याची गरज नाही.
पहा मोबाईलमधील 'पॉवर' बटणाचे काही फायदे
'पॉवर' बटणाचा वापर करून तुम्हांला फोन कट करायचा असेल किंवा उचलायचा असेल तर त्यासाठी काही बदल करावे लागतील
फोनमधील सेटिंगमध्ये Accsessebiltiy चा पर्याय निवडा.
त्याखाली पावर बटण एन्ड कॉल हा पर्याय तुम्हांला दिसेल.
आता फोनच्या पावर बटणाचा वापर करून तुम्ही कॉल कट करू शकाल.
काही फोनमध्ये कॉल रिसिव्ह करण्याचाही ऑप्शन आहे.