नवी दिल्ली : चॅट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप हे चॅटींगसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. पण आता व्हॉटसअॅप नव्या रुपात आपल्या समोर येणार आहे. छोटे उद्योग असणाऱ्यांसाठी व्हॉट्सअॅपने नवीन अॅप लॉन्च केला आहे. त्याचे नाव आहे व्हॉट्सअॅप बिझनेज. व्यावसायिक यात आपले अकाऊंट बनवू शकतात आणि आपल्या बिझनेजचे प्रमोशन करू शकतात. त्यामुळे व्यावसायिकांना आपल्या ग्राहकांशी संवाद साधणे, त्यांच्या मागण्या समजून घेणे सोपे होईल.
WhatsApp Business App ची गेल्या वर्षभरापासून चर्चा आहे. मात्र कंपनीने आता ते लॉन्च केले आहे. सध्या छोट्या व्यावसायिकांना लक्षात घेऊन ते तयार करण्यात आले आहे. या अॅपच्या मदतीने ग्राहकांशी कनेक्ट होणे सहज, सोपे होईल. सध्या हे अॅप इंडोनेशिया, इटली, मॅक्सिको, युके आणि अमेरिका या देशात लॉन्च करण्यात आले आहे. येत्या काही दिवसात हे इतर देशातही लॉन्च करण्यात येईल.
या अॅपच्या माध्यमातून युजर्स आपल्या बिझनेसला नवीन ओळख देऊ शकतात. या अकाऊंटमधून तुम्ही तुमच्या बिझनेसची माहिती देऊ शकता. त्याचबरोबर ई-मेल आयडी, स्टोर आणि वेबसाईटची माहिती, फोन नंबर पाठवू शकता. यात दिलेल्या मेसेजिंग टूलच्या साहाय्याने ऑटोमेटिक मेसेज पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. यात सामान्य प्रश्नांची उत्तरे तुम्ही जलद देऊ शकता.
जर तुम्ही इतर कामात व्यस्त असाल तर 'अवे' मेसेजचा ऑप्शन आहे. त्याचबरोबर मेसेज स्टटेस्टिक्समधून किती मेसेज वाचले गेले आणि त्यांचा परफार्मंस कसा होता, हे कळले. याची सर्वात खास गोष्ट म्हणजे ग्राहकांना वेगळे अॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही. सामान्य व्हॉट्सअॅप अकाऊंटमधून तुम्ही व्हॉट्सअॅप बिझनेस अकाऊंटवर कनेक्ट करू शकता.