मुंबई : व्हॉट्सअॅप हे सर्वात लोकप्रिय अॅप्स पैकी एक आहे. जगभरात व्हॉट्सअॅपचे लाखो युजर्स आहेत. आपण याचा वापर जवळच्या लोकांशी संवाद साधन्यासाठी आणि त्यांना फोटो, व्हिडीओ किंवा महत्वाचे डॉक्यूमेंट शेअर करण्यासाठी करतो. व्हॉट्सअॅपने आपलं अर्ध काम सोपं केलं आहे. परंतु हे लक्षात घ्या की, प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात, ज्यामुळे आपल्याला व्हॉट्सअॅपचे जेवढे फायदे आहेत, तितकेच त्याचे तोटे देखील आहेत. ज्याची आपल्याला माहिती नसते.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि चॅटिंग अॅप्सबद्दल बोलायचे झाले, तर बहुधा व्हॉट्सअॅपचे नाव सर्वात पहिल्या स्थानावरती आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच लोकं व्हॉट्सअॅपचा वापर करताता, त्यामुळे येथे ठग्यांना त्यांना टार्गेत करणं सोपं जातं.
अलीकडेच एक नवीन घोटाळा समोर आला आहे, ज्याला Rediroff.ru असे नाव देण्यात आले आहे. या घोटाळ्याद्वारे, व्हॉट्सअॅप वापरकर्ते त्यांचे वैयक्तिक आणि आर्थिक माहिती त्यामध्ये भरतात. ज्यामुळे त्यांच्या खात्यातून पैसे देखील चोरीला जात आहेत.
हा घोटाळा काय आहे आणि तुम्ही यापासून स्वतःचे संरक्षण कसे करू शकता? याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
Rediroff.ru घोटाळा Linkद्वारे कार्य करतो. चोर वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅपवर एक लिंक पाठवतात, ज्यावर वापरकर्ते क्लिक करताच त्यांना त्यांच्या स्क्रीनवर एक नवीन वेबपेज दिसते. या वेबपेजवर असे लिहिले आहे की, वापरकर्त्यांनी यामध्ये माहिती भरल्यास त्यांना मोठे बक्षीस मिळू शकते.
यामधील प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर, वापरकर्त्यांना नवीन वेबसाइटवर नेले जाते जेथे त्यांचे नाव, वय, पत्ता आणि बँक तपशील यासारखी माहिती घेतली जाते. अशा प्रकारे, वापरकर्ते रिवॉर्ड्साठी त्यांची वैयक्तिक माहिती सायबर चोरांसोबत शेअर करतात.
तुम्हाला प्रश्न पडत असेल की हे सायबर चोर तुमच्या माहितीचे काय करतात, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, तुमचे बँक डिटेल्स वगैरे घेऊन चोर तुमच्या नावावर चुकीचे व्यवहार करू शकतात. ते तुमचा डेटा यॉर्क वेबच्या गुन्हेगारांना विकू शकतात. तसेच डायरेक्ट तुमच्या खात्यातून देखील तुम्ही पैसे काढू शकता.
जर तुम्हाला या घोटाळ्यापासून लांब राहायचे असेल, तर तुमच्यापर्यंत कोणतीही लिंक आली तर ती काळजीपूर्वक वाचा आणि मगच त्यावर क्लिक करा. जर ही स्पॅम लिंक असेल आणि त्यात 'Rediroff.ru' दिसत असेल, तर ती स्पॅम म्हणून चिन्हांकित करून त्वरित हटवा.
जर चुकून तुम्ही कोणत्याही लिंकवर क्लिक केले असेल, तर ती लगेच बंद करा आणि अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरच्या मदतीने तुमचा फोन स्कॅन करा.
जर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर असे कोणतेही अॅप दिसले की, जे तुम्ही डाउनलोड केलेले नाहीत किंवा तुमच्या उपयोगाचे नाहीत, तर ते लगेच तुमच्या स्मार्टफोनमधून अनइंस्टॉल करा.
यावेळी तुम्हाला Rediroff.ru घोटाळ्याबाबत अधिक सावधगिरी बाळगावी लागेल, कारण या वेळी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने संबंधित प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे हे सगळे मेसेज क्लिक करणं आणि मित्रांना शेअर करणं देखील तुम्ही टाळा.