WhatsAppचा पुन्हा युटर्न; प्रायव्हसी पॉलिसी स्विकारली नसल्यासही खाते सुरूच राहणार

जगातील सर्वांत जास्त वापरले जाणारे मॅसेंजर ऍप म्हणजे WhatsApp ने 15 मे पासून लागून होणारी गोपनियतेचे धोरण सध्या स्थगित केले आहे

Updated: May 7, 2021, 09:42 PM IST
WhatsAppचा पुन्हा युटर्न; प्रायव्हसी पॉलिसी स्विकारली नसल्यासही खाते सुरूच राहणार

नवी दिल्ली : जगातील सर्वांत जास्त वापरले जाणारे मॅसेंजर ऍप म्हणजे WhatsApp ने 15 मे पासून लागून होणारी गोपनियतेचे धोरण सध्या स्थगित केले आहे. कंपनीने नवीन गोपनियता धोरण लागू करण्यासाठीची नवीन तारिख सांगितलेली नाही. नवीन गोपनियता धोरणाचा स्विकार न करणाऱ्या वापरकर्त्यांचे खाते सध्या बंद होणार नाही. असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

वापरकर्त्यांना नवीन गोपनियता धोरणाची  आठवण देत राहणार

व्हाट्सअपने म्हटले आहे की, नवीन गोपनियता धोरणाचा मॅसेज वापरकर्त्यांना पाठवत राहणार, ही प्रक्रिया पुढचे काही आठवडे सुरू राहणार. नवी गोपनियता धोरण 8 फेब्रुवारी रोजी लागू होणार होते. परंतु यावरून विवाद उभा राहिल्याने ही तारिख 15 मे पर्यंत वाढवण्यात आली. आता पुन्हा व्हाट्सअपने हे धोरण सध्यातरी लागू करणार नसल्याचे म्हटले आहे.

नवीन गोपनियता धोरण काय?

WhatsApp वापरकर्ते कंटेंट अपलोड, सबमिट, स्टोअर, सेंड आणि रिसिव्ह करू शकतात. या डेटाचा वापर आता कंपनीदेखील करणार आहे.कंपनी तो डेटा शेअर करू शकणार आहे. 15 मेपर्यंत वापरकर्त्यांनी गोपनियता धोरणाचा स्विकार न केल्यास खाते बंद होणार होते. परंतु आता कंपनीने हा निर्णय मागे घेतला आहे.