Hi Mum, Hi Dad! तुमच्या WhatsAppवर हा मेसेज आला आहे का?

ऑनलाईन युगात फसवणूकीचे नवनवे प्रकार समोर येत आहेत, आता अशाच एका मेसेजने जगभरात धुमाकूळ घातला आहे, व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या या मेसेजने पाहा कशी होते फसवणूक

Updated: Dec 20, 2022, 05:37 PM IST
Hi Mum, Hi Dad! तुमच्या WhatsAppवर हा मेसेज आला आहे का?  title=

"Hi Mum, Hi Dad" WhatsApp Fake Message : व्हॉट्सअप जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टन्ट मेसेजिंक अॅप  (Instant Messaging App) आहे. कोट्यवधी लोकं या अॅपचा दररोज वापर करतात. त्यामुळेच स्कॅमर्ससाठी (Scammers) हा प्लॅटफॉर्म माशांनी भरलेल्या तलावांसारखा आहे, जिथे जाळं फेकल्यावर कुणा ना कुणाचं फसणं निश्चित आहे. आता स्कॅमर्सनी नवा स्कॅम शोधलाय ज्यात अनोळखी नंबरवरुन व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) संपर्क साधला जातो. Hi Mum किंवा Hi Dad असे मेसेज केले जातात आणि युसर्जना गंडा घातला जातो. या मेसेजमुळे (Message) आतापर्यंत 57 कोटी युसर्जची लूट झाल्याचं समोर आलंय. नेमकी चोरट्यांची मोडस ऑपरेंडी (Modus Operandi) काय आहे पाहुयात..

कशी होतेय लूट? 
तुम्हाला व्हॉट्सअॅपवर Hi Mum किंवा Hi Dad असा मेसेज येतो. एखाद्या जवळच्या नातेवाईकाच्या (Relatives) नावानं हा मेसेज केला जातो. युसर्जशी (Users) त्याच्याच भाषेत संवाद साधला जातो. फोन तुटलाय किंवा खराब झालाय असं समोरुन भासवण्यात येतं. जीव धोक्यात आहे, हॉस्पिटलमध्ये आहे असं भासवलं जातं. बँक डिटेल्स किंवा ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याची विनंती केली जाते आणि भावनिक करुन युसर्जना गंडा घातला जातो

अशापद्धतीनं स्कॅमर्स अनोळखी नंबरवरुन तुम्हाला मेसेज करतात, तुमच्याच भाषेत संवाद साधतात, भावनिक करतात आणि पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. अशा स्कॅमपासून कसं वाचाल हेही थोडक्यात पाहुयात..

स्कॅमपासून कसे वाचाल?
मित्र किंवा नातेवाईकांच्या नावानं येणाऱ्या अनोळखी मेसेजपासून सावधान राहा. विशेषत: पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी युसर्जकडून पर्सनल डिटेल्स मागा. कोणताही OTP शेअर करु नका. अनोळखी मेसेजवरुन आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लीक करु नका आणि संशय आला तर समोरचा नंबर ब्लॉक करा किंवा थेट नंबर रिपोर्ट करा

हे ही वाचा : Covid-19: तीन महिन्यात तीन लाटा! रुग्णालयच काय स्मशानभूमतीही जागा नाही, कोरोनाचा उद्रेक

सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. जवळपास प्रत्येकाकडे मोबाईल आहे. प्रत्येक गोष्ट ऑनलाईन उपलब्ध आहे. साहजिकच ऑनलाईन फसवणूकीचे प्रकारही वाढले आहेत. सायबर गुन्हेगार फसवणूकीसाठी नवनवे फंडे वापरत आहेत. 

ऑस्ट्रेलियामध्ये अशा व्हॉट्सअॅप स्कॅमनं (WhatsApp Scam) धुमाकूळ घातलाय. भारतात अशा पद्धतीच्या स्कॅमची (Scam) एकही केस समोर आलेली नाही. पण तरीही आपण सावधान आणि सतर्क राहायला हवं. (whatsapp text message scam )